विधान परिषद : महायुतीमध्ये महाभारत, शायना-भांडारींना डावलले

विधान परिषदेच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये महाभारत सुरू होण्याची चिन्ह आहेत. विधान परिषदेच्या चार जागांसाठी उमेदवार जाहीर झाले असून यात भाजपनं मित्र पक्षातील दोघांना उमेदवारी दिली. तर शायना एनसी आणि माधव भांडारी यांनी डावलले.

Updated: Jan 20, 2015, 01:11 PM IST
विधान परिषद :  महायुतीमध्ये महाभारत, शायना-भांडारींना डावलले title=

मुंबई : विधान परिषदेच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये महाभारत सुरू होण्याची चिन्ह आहेत. विधान परिषदेच्या चार जागांसाठी उमेदवार जाहीर झाले असून यात भाजपनं मित्र पक्षातील दोघांना उमेदवारी दिली. तर शायना एनसी आणि माधव भांडारी यांनी डावलले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आणि रामदास आठवलेल्या रिपाइं गटाला भाजपने डावलले आहे. भाजपनं रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे, आणि भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केलीय. तर शिवसेनेकडून उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपनं चार मित्रपक्षांपैकी दोघांना विधान परिषदेचं तिकिट देऊन, भाजपनं त्यांची नाराजी काही अंशी दूर करण्याचा प्रयत्न केलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ऊस दरासाठी केलेलं हिंसक आंदोलन महाग पडल्याचं बोललं जातंय. एका बाजुला ऊस दर आंदोलन सुरू असताना सरकारमध्ये सामील होण्याबाबतही राजू शेट्टी द्विधा मनस्थितीत आहेत. विधान परिषदेचे उमेदवार थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.