www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
एकेकाळचे शिवसैनिक आणि सद्य काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना चक्क `बेडूक` म्हणून हिणवलंय.
`पाऊस पडल्यावर बेडकाचा आवाज येतो तशी अवस्था उद्धव ठाकरेंची आहे. निवडणुका आल्या की उद्धव ठाकरे बिळातून बाहेर पडतात` अशी टीका नारायण राणेंनी केलीय.
रत्नागिरीत रविवारी महायुतीच्या सभेत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर टीका केली होती. त्या टीकेला राणेंनी सोमवारच्या रत्नागिरीतल्या सभेत जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
व्हिडिओ पाहा -
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.