लग्नपत्रिका

खासदार श्रीकांत शिंदेंच्या 'शाही लग्नाची गोष्ट'...

सामान्य नागरिक पैशांसाठी बँकांसमोर रांगा लावत असतानाच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा खासदार मुलगा श्रीकांत शिंदे यांच्या लग्नाच्या डामडौलानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात.

Nov 19, 2016, 09:10 AM IST

युवराज सिंगची ही लग्नपत्रिका आली चर्चेत

क्रिकेटर युवराज सिंग आणि बॉलिवूड अभिनेत्री हेजल किच यांचा विवाह लकवरच पार पडणार आहे. दोघेही लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. युवराज आणि हेजल यांचा विवाह 30 नोव्हेंबरला होणार आहे. हिंदू आणि शीख अशा दोन्ही धर्माच्या रितीरिवाजानुसार विवाह होणार आहे.

Nov 6, 2016, 03:22 PM IST

लग्नपत्रिका सोशल मीडियावर होतेय प्रचंड व्हायरल

भारतीय संस्कृतीमध्ये विवाह पद्धतीला खूप महत्त्व आहे. विवाहाची तयारी सुरु ही लग्न पत्रिकेपासून होते. प्रत्येकाला असं वाटतं की त्यांच्या विवाहाची लग्नपत्रिकाही हटके असावी. यासाठीच आता लग्नपत्रिकेबाबत अनेक वेगवेगळे प्रयोग पाहायला मिळतात.

Sep 13, 2016, 05:17 PM IST

लग्नपत्रिकेतून दिला पाणी बचतीचा संदेश

मनमाडच्या रमाबाईनगर भागात राहणा-या कांबळे कुटुंबीयांनी पाणी बचतीचा असा आगळावेगळा संदेश दिलाय. कांबळे कुटुंबातल्या संजनाचं लवकरच लग्न होणारेय. मनमाडमधली भीषण पाणीटंचाई लक्षात घेता त्यांनी लग्न पत्रिकेवर पाणी बचतीचा संदेश छापलाय. तहानलेल्या पाणी देणं हे पुण्यकर्म पण तहानलेल्यासाठी पाणी जपून ठेवणं हे महापुण्यकर्म या संदेशाबरोबरच लेक वाचवण्याचा संदेश छापलाय. 

Jun 3, 2016, 11:16 PM IST

लग्नाची अशी पत्रिका तुम्ही पाहिलीच नसेल

एका फार्मा कंपनीच्या एमडीपदी असलेल्या व्यक्तीच्या कन्येचा विवाह असल्याने, त्यांनी खास औषधी ठेवण्याच्या खोक्याप्रमाणे पत्रिका छापली आहे. या पत्रिकेवर इटर्नल लव्ह टॅबलेट लिहण्यात आलंय, भाषाही फार्मसीला शोभेल अशीच आहे. टॅबलेट सारख्या खोक्यात गोळ्या दिसत आहेत, त्या गोळ्या नसून त्याबदल्यात बदाम ठेवण्यात आले आहेत.

Dec 17, 2015, 12:04 AM IST

23 जानेवारीला लग्न करताहेत विराट-अनुष्का, लग्नपत्रिका झाली लीक!

टीम इंडियात सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. हरभजन सिंगने 29 ऑक्टोबरला लग्न केल्यानंतर रोहित शर्मा आणि त्याची मैत्रिण रितिका येत्या डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत. आता त्याच्यानंतर क्रमांक येतो टेस्ट कर्णधार विराट कोहली याचा. बॉ़लिवूड अभिनेत्री अनुष्का आणि विराट कोहली 23 जानेवारी रोजी लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. 

Nov 3, 2015, 03:07 PM IST

सुरेश रैना आणि प्रियांकाच्या लग्नाची पाहा पत्रिका

भारतीय टीमचा स्टार प्लेअर सुरेश रैना लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. त्याच्या लग्नाची तयारी अगदी जोरात सुरू आहे. त्याच्या लग्नाच्या लग्नपत्रिकासुद्धा छापल्या गेल्या आहेत. 

Mar 27, 2015, 07:21 PM IST

हे आधारकार्ड नाही, लग्नपत्रिका आहे...

हे आधारकार्ड नाही, लग्नपत्रिका आहे... 

Dec 23, 2014, 10:37 AM IST

एटीएम कार्ड नव्हे ही तर लग्नपत्रिका!

गुलाबी थंडी... म्हणजे लग्नसमारंभांचा काळ... लग्न म्हटलं की लग्नपत्रिका ही आलीच. मात्र आता काळानुसार या लग्नपत्रिकांचा लुक बदलू लागलाय. तसाच काहीसा प्रकार आपल्याला या फोटोतील पत्रिका पाहून वाटेल. एटीएम कार्ड असाच प्रश्न या पत्रिकेकडे पाहिले की निर्माण होतो.

Dec 22, 2013, 01:05 PM IST