लग्नपत्रिकेतून दिला पाणी बचतीचा संदेश

मनमाडच्या रमाबाईनगर भागात राहणा-या कांबळे कुटुंबीयांनी पाणी बचतीचा असा आगळावेगळा संदेश दिलाय. कांबळे कुटुंबातल्या संजनाचं लवकरच लग्न होणारेय. मनमाडमधली भीषण पाणीटंचाई लक्षात घेता त्यांनी लग्न पत्रिकेवर पाणी बचतीचा संदेश छापलाय. तहानलेल्या पाणी देणं हे पुण्यकर्म पण तहानलेल्यासाठी पाणी जपून ठेवणं हे महापुण्यकर्म या संदेशाबरोबरच लेक वाचवण्याचा संदेश छापलाय. 

Updated: Jun 3, 2016, 11:16 PM IST
लग्नपत्रिकेतून दिला पाणी बचतीचा संदेश  title=

नाशिक : मनमाडच्या रमाबाईनगर भागात राहणा-या कांबळे कुटुंबीयांनी पाणी बचतीचा असा आगळावेगळा संदेश दिलाय. कांबळे कुटुंबातल्या संजनाचं लवकरच लग्न होणारेय. मनमाडमधली भीषण पाणीटंचाई लक्षात घेता त्यांनी लग्न पत्रिकेवर पाणी बचतीचा संदेश छापलाय. तहानलेल्या पाणी देणं हे पुण्यकर्म पण तहानलेल्यासाठी पाणी जपून ठेवणं हे महापुण्यकर्म या संदेशाबरोबरच लेक वाचवण्याचा संदेश छापलाय. 

केवळ कांबळे कुटुंबांप्रमाणंच शहरातल्या गायकवाड चौकात राहणा-या प्रमोद आहिरे यांनीही त्यांच्या भावाच्या लग्न पत्रिकेत जल है तो कल है, पाण्याचा वापर जपून करा, पाणी वाचवा असा छापला होता. सगळ्यांनाच पाणी बचतीचं महत्त्व कळावं यासाठी अशी युक्ती केल्याचं आहिरे सांगतात. 

शासन पाणी टंचाई निवारणासाठी प्रयत्न करेल तेव्हा करेल मात्र उपलब्ध पाणी वाचविण्यासाठी आहिरे -कांबळे कुटुंबानं टाकलेलं पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे.