23 जानेवारीला लग्न करताहेत विराट-अनुष्का, लग्नपत्रिका झाली लीक!

टीम इंडियात सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. हरभजन सिंगने 29 ऑक्टोबरला लग्न केल्यानंतर रोहित शर्मा आणि त्याची मैत्रिण रितिका येत्या डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत. आता त्याच्यानंतर क्रमांक येतो टेस्ट कर्णधार विराट कोहली याचा. बॉ़लिवूड अभिनेत्री अनुष्का आणि विराट कोहली 23 जानेवारी रोजी लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. 

Updated: Nov 3, 2015, 03:07 PM IST
23 जानेवारीला लग्न करताहेत विराट-अनुष्का, लग्नपत्रिका झाली लीक! title=

मुंबई : टीम इंडियात सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. हरभजन सिंगने 29 ऑक्टोबरला लग्न केल्यानंतर रोहित शर्मा आणि त्याची मैत्रिण रितिका येत्या डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत. आता त्याच्यानंतर क्रमांक येतो टेस्ट कर्णधार विराट कोहली याचा. बॉ़लिवूड अभिनेत्री अनुष्का आणि विराट कोहली 23 जानेवारी रोजी लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. 

सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली आहे. विराट आणि अनुष्का 23 जानेवारीला लग्न करणार आहेत. किबी बॉय येह येह नावाने एका फेसबूक अकाउंटवर विराट अनुष्काच्या लग्नाची पत्रिका शेअर करण्यात आली आहे. मात्र, काही वेळानंतर ती डिलिट करण्यात आली. 

आपल्या फेसबूक अकाउंटच्या प्रोफाइल फोटोमध्ये हा व्यक्ती विराटसोबत दिसत आहे. या फेसबूक अकाउंटनुसार हा व्यक्ती आंध्र क्रिकेट असोसिएशनमध्ये काम करीत आहे. 

या कार्डमध्ये खूप चुका दिसून आल्या आहे, पण हे सर्व किती खरं आहे यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. दोघांच्या लग्नाची तारीख 23th लिहिली आहे, पम 23rd लिहायला हवे होते. 

लग्नपत्रिकेनुसार लग्न मुंबईतील द ताज हॉटेलमध्ये होणार आहे. दोघांची लग्नपत्रिका बनिवण्याचा प्रयत्न केला आहे पण हे सर्व खोटं दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच अनुष्काने आपल्या लग्नबद्दल म्हटले होते की आताच लग्नाचा काही विचार नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.