मुंबई । काँग्रेस - राष्ट्रवादीचा जागा वाटपाचा तिढा सोडविण्यासाठी बैठक
राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीबाबत उद्या साडे पाच वाजता काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली आहे. लवकरच जागावाटपाचा प्रश्न मार्गी लागेल. घटक पक्षांशी चर्चा सुरू आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. राज्यात सर्व छोट्या-मोठ्या राजकीय पक्षांच्या महाआघाडीला अंतिम रूप देण्याचा शेवटचा टप्पा असणार आहे. समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. तसेच काँग्रेस राष्ट्रवादीतील उरलेल्या ८ जागांबाबत चर्चा आता राज्यस्तरावरच होणार आहे. यासाठी उद्या संध्याकाळी काँग्रेस राष्ट्रवादीची महत्वाची बैठक असेल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
Jan 5, 2019, 11:15 PM ISTकाँग्रेस - राष्ट्रवादीचा जागा वाटपाचा तिढा सुटणार!
काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीबाबत उद्या साडे पाच वाजता काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली आहे.
Jan 5, 2019, 11:01 PM ISTसुनील तटकरे यांनी शिवसेनेचे नाराज नेते दळवींची घेतली भेट
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे नाराज माजी आमदार सूर्यकांत दळवी यांची घरी जाऊन भेट घेतली.
Jan 5, 2019, 09:35 PM ISTमहापौर निवडणूक : भाजपला मतदान, राष्ट्रवादी करणार त्या नगरसेवकांशी चर्चा
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला मतदान करणाऱ्या अहमदनगरच्या राष्ट्रवादी नगरसेवकांना मुंबईत पाचारण करण्यात आले आहे.
Jan 4, 2019, 08:39 PM ISTनवी मुंबई राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाराज, पक्षाला देणार सोडचिठ्ठी?
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार हे नाराज आहेत.
Jan 3, 2019, 11:29 PM ISTशिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा !
अहमदनगर महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी सोबत अभद्र युती करत सत्ता स्थापन केली.
Dec 30, 2018, 12:00 AM ISTकाँग्रेस सोडणार नाही, पण लोकसभा लढविणार - सुजय विखे-पाटील
कोणत्याही परिस्थितीत आपण लोकसभा निवडणूक लढवणार म्हणजे लढवणार आहोत. मात्र भाजपत जाणार नाही, अशी माहिती काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय यांनी दिली.
Dec 29, 2018, 08:15 PM ISTअहमदनगर । लोकसभा निवडणूक लढवणार - सुजय
कोणत्याही परिस्थितीत आपण अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढवणार म्हणजे लढवणार आहोत. मात्र भाजपत जाणार नाही, अशी माहिती काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय यांनी दिली.
Dec 29, 2018, 08:05 PM ISTमुख्यमंत्र्यांपुढे अजिबात झुकू नका : अजित पवार
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या नरेंद्र पाटील यांना माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी सल्ला दिलाय.
Dec 27, 2018, 11:00 PM ISTराष्ट्रवादी देणार तृतीयपंथी व्यक्तीला उमेदवारी : सुप्रिया सुळे
राष्ट्रवादीने तृतीयपंथी व्यक्तीला निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याबाबत विचार केलाय.
Dec 27, 2018, 10:31 PM ISTभाजपमध्ये आपण सुखी आहोत : गावित
विजयकुमार गावित हे आपली कन्या हिना हिच्यासह घर वापसी करणार असल्याचे वृत्त होते. मात्र, या वृत्ताचा गावित यांनी इन्कार केलाय.
Dec 26, 2018, 11:33 PM ISTमुंबई । काँग्रेस राष्ट्रवादीत सात जागांवरून जागावाटपाचा तिढा कायम
काँग्रेस राष्ट्रवादीत सात जागांवरून जागावाटपाचा तिढा कायम, आता तोडगा काढण्यासाठी दिल्ली स्तरावरच चर्चा होणार, सूत्रांची माहिती, पुण्याच्या जागेवरील राष्ट्रवादीचा दावा कायम....
Dec 25, 2018, 09:55 PM ISTखान्देशात राजकीय उलथापालथ, विजयकुमार गावित यांची घरवापसी?
निवडणुकांच्या तोंडावर खान्देशात मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता आहे. भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.
Dec 25, 2018, 09:21 PM ISTनंदूरबार । विजयकुमार गावित स्वगृही परतणार?
भाजपमध्ये गेलेले विजयकुमार गावित आपल्या मुलीसह राष्ट्रवादीत परतण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने नंदूरबारच्या जागेवर दावा केलाय. जर ही जागा काँग्रेसने राष्ट्रवादीला सोडली तर गावित स्वगृही परतण्याची शक्यता आहे.
Dec 25, 2018, 09:15 PM ISTसातारा । 'मराठा आरक्षण न्यायालयात किती टिकेल, याबाबत शंका'
सातारा : राज्यातील भाजप सरकारने मराठा आरक्षण लागू केले आहे. मात्र, हे मराठा आरक्षण न्यायालयात किती टिकेल, याबाबत शंका आहे, अशी पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेय. पाटणमध्ये आज राष्ट्रवादीचा जाहीर मेळावा झाला. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केलेय. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत चर्चा सुरु झालेय.
Dec 25, 2018, 08:00 PM IST