खान्देशात राजकीय उलथापालथ, विजयकुमार गावित यांची घरवापसी?

निवडणुकांच्या तोंडावर खान्देशात मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता आहे.  भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

Updated: Dec 25, 2018, 09:23 PM IST
खान्देशात राजकीय उलथापालथ,  विजयकुमार गावित यांची घरवापसी? title=

जळगाव : निवडणुकांच्या तोंडावर खान्देशात मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता आहे. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. तर विजयकुमार गावित यांच्या घरवापसीच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

'कोणीही एकाच पक्षाचा शिक्का लावून कायमस्वरूपी तिथं राहत नाही'

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाटपात नंदुरबार या काँग्रेसच्या परंपरागत मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावा ठोकला आहे. राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपत गेलेल्या विजयकुमार गावित यांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाली आहे. 

जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला तरच विजयकुमार गावित आपली कन्या खासदार हिना गावित यांच्यासह पुन्हा राष्ट्रवादीत येऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत अधिकृत बोलायला राष्ट्रवादीचे नेते तयार नाहीत. सध्या तरी काँग्रेस नंदुरबार हा आपला परंपरागत मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडायला तयार नाही. मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने सोडला तर गावितांची घरवापसीची शक्यता आहे.