राणेंची वांद्रे पूर्वमधून उमेदवारी निश्चित, अधिकृत घोषणा लवकरच

वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून नारायणे राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. काही वेळातच काँग्रेसकडून याबाबतची अधिकृत घोषणा होणार आहे. उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर राणे मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी माहिती मिळतेय.

Updated: Mar 22, 2015, 08:33 PM IST
राणेंची वांद्रे पूर्वमधून उमेदवारी निश्चित, अधिकृत घोषणा लवकरच title=

मुंबई: वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून नारायणे राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. काही वेळातच काँग्रेसकडून याबाबतची अधिकृत घोषणा होणार आहे. उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर राणे मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी माहिती मिळतेय.

शिवसेनेचे आमदार प्रकाश उर्फ बाळा सावंत यांच्या निधनामुळं ही पोटनिवडणूक होतेय. शिवसेनेनं या पोटनिवडणुकीसाठी बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळं या निवडणुकीत राणे विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे.

तत्पूर्वी नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसनं राणेंना पाठिंबा देण्याचं जाहीर केलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.