राष्ट्रपतीपदाची निवडणूक

राष्ट्रपतीपदाची निवडणूक : नवी दिल्लीत विविध बैठकांचं सत्र

राष्ट्रपतीपदासाठी सोमवारी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी बैठकांचा सिलसिला पाहायला मिळणार आहे. नवी दिल्लीत विविध बैठकांचं सत्र पाहायला मिळेल.

Jul 16, 2017, 09:35 AM IST

राष्ट्रपतीपदाची निवडणूक: भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक

आज भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. राष्ट्रपतीपद निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे. तसंच भाजपचे मंत्री आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. याशिवाय भाजपनं आपल्या सर्व खासदारांची सोमवार आणि मंगळवारी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत या खासदारांना राष्ट्रपतीपद निवडणुक प्रक्रियेची माहिती देण्यात येईल. 

Jun 19, 2017, 09:41 AM IST

संगमांचं जेडीयू-सेनेला पाठिंब्यासाठी आवाहन...

आज दुपारी भाजपनं पी. संगमा यांना पाठिंबा जाहीर केला. भाजपनं जाहिर केलेल्या पाठिंब्यामुळे पी. संगमा यांचा आत्मविश्वासही दुणावलाय. भाजपनंतर आता जेडीयू आणि शिवसेनेलाही समर्थनासाठी गळ घातलीय.

Jun 21, 2012, 07:03 PM IST

राष्ट्रपतीपदावरून खल सुरूच, एनडीएची बैठक सुरू

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावरुन ममता आणि काँग्रेसमध्ये सुरु झालेला वाद एनडीएच्या पथ्यावर पडण्याची शक्यता निर्माण झालीय. बदलेल्या समीकरणातच आज एनडीएची बैठक होणार आहे.

Jun 15, 2012, 12:58 PM IST

'२०१४ पर्यंत मनमोहन सिंग हेच पंतप्रधान'

राष्ट्रपतीपदाची निवडणुकीवरून दिल्लीतल्या घडामोडींना वेग आलाय. २०१४पर्यंत मनमोहन सिंग हेच पंतप्रधान राहतील, असं काँग्रेसचे प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे मनमोहन सिंग यांचं नाव राष्ट्रपतीच्या स्पर्धेतून बाहेर पडल्याचं स्पष्ट झालंय.

Jun 14, 2012, 02:36 PM IST