राष्ट्रपतीपदावरून खल सुरूच, एनडीएची बैठक सुरू

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावरुन ममता आणि काँग्रेसमध्ये सुरु झालेला वाद एनडीएच्या पथ्यावर पडण्याची शक्यता निर्माण झालीय. बदलेल्या समीकरणातच आज एनडीएची बैठक होणार आहे.

Updated: Jun 15, 2012, 12:58 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावरुन ममता आणि काँग्रेसमध्ये सुरु झालेला वाद एनडीएच्या पथ्यावर पडण्याची शक्यता निर्माण झालीय. बदलेल्या समीकरणातच आज एनडीएची बैठक होतेय. लालकृष्ण अडवाणी यांच्या घरी ही बैठक नुकतीच सुरू झालीय. बैठकीला भाजप अध्यक्ष नितीन गडकरी, सुषमा स्वराज, संयुक्त जनता दलाचे शरद यादव, शिवसेनेचे नेते संजय राऊत उपस्थित आहेत.

.

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांवरुन ममता आणि मुलायम यांची टाकलेल्या गुगलीनंतर युपीए गोँधळात सापडली. तर दुसरीकडे एनडीएनं मोर्चेबांधणी सुरु केलीय. याच संदर्भात लालकृष्ण अडवाणींनी जयललिता यांची भेट घेतली. या भेटीत नावावर शिक्कामोर्तब झालं नाही. मात्र, संपर्कात राहणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. जयललितांनाही आपले पत्ते सध्या झाकून ठेवणंच पसंत केलंय.

.

मात्र एनडीएसाठीही हे इतकं सोपं नाही. एनडीएतही वेगवेगळे सूर ऐकू येत आहेत. अकाली दलाने कलामांचं समर्थन केलय, तर जेडीयूची भूमिका वेगळी आहे. जर एनडीएत एका  नावावर सहमती झाली आणि त्यांनी उमेदवार दिला तर ही लढत आणखीन उत्कंठावर्धक होण्याची शक्यता आहे. कारण युपीए आणि एनडीए या दोघांकडेही पूर्ण बहुमताची वानवा आहे. अशा स्थितीत गैर एनडीए आणि गैर युपी पक्ष महत्त्वाचे ठरतील.

.

.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x