मराठी टक्का कमी करण्याचे षडयंत्र- राज ठाकरे

उत्तर भारतीय मुंबईत किंवा पुण्यात मतदान करतात आणि उत्तर प्रदेशात जाऊनही मतदान करतात. एकच व्यक्ती दोनदोनदा मतदान करतो असं राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रातील शहरे वेडीवाकडी वाढताहेत आणि मराठी टक्का कमी करण्याचा षडयंत्र राजरोसपणे रचलं जात आहे असा सावधनतेचा इशारा राज ठाकरेंनी दिला.

Updated: Feb 8, 2012, 06:40 PM IST

www.24taas.com, पुणे

 

उत्तर भारतीय मुंबई-पुण्यात मतदान करतात आणि उत्तर प्रदेशात जाऊनही मतदान करतात. एकच व्यक्ती दोन-दोनदा मतदान करतो. महाराष्ट्रातील शहरे वेडीवाकडी वाढताहेत आणि मराठी टक्का कमी करण्याचा षडयंत्र राजरोसपणे रचलं जात आहे, असा सावधनतेचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.

 

पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी राज ठाकरेंनी पुण्यात रोड शो केला. रोड शोनंतर केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या पाच वर्षात मी रोड शो केले नव्हते, आता पहिल्यांदाच मी रोड शोद्वारा प्रचार करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.  याला रोड शो म्हणतात हे मला माहिती नाही, असा मिश्किल फटकेबाजीही राज ठाकरे यांनी यावेळी केली.

 

मनसेने गुंडांना उमेदवारी दिली नाही, योग्य व्यक्तींनाच उमेदवारी दिली. शिवाजी पार्क इथे सभा घेण्याच्या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर करत असलो तरी तो कायद्याच्या चौकटीत हवा, कोर्टाचा निर्णय हा माझ्याकडून नाही तर न्याय असावा, अशी आपली भूमिका असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं.

 

एकाच प्रभागात अनेक इच्छुक असतात आणि त्यामुळेच ज्यांना उमेदवारी मिळत नाही ते नाराज होणं स्वाभाविकच आहे, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं.