राजीनामा

कोल्हापूरच्या लाचखोर महापौर तृप्ती माळवी यांचा राजीनामा

लाचखोर महापौर तृप्ती माळवी यांनी आज अखेर आपला राजीनामा दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. माळवी उद्या महापालिका आय़ुक्तांकडे महापौरपदाचा राजीनामा सुपूर्द करणार आहेत.

Feb 1, 2015, 12:15 PM IST

काँग्रेसला धक्का: जयंती नटराजन यांचा ना'राजीनामा'

काँग्रेस आता पूर्वीसारखा पक्ष राहिलेला नाही, पक्षात घुसमट होत असून अशा वातावरणात काम करता येणार नाही, असं सांगत माजी केंद्रीय मंत्री जयंती नटराजन काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.  

Jan 30, 2015, 02:27 PM IST

'MSG'प्रकरणी सेन्सॉर बोर्डच्या १२ जणांचे राजीनामे

केंद्र सरकारकडून हस्तक्षेप वाढत असून उपेक्षापूर्ण वागणूक मिळत असल्याचा आरोप करीत सेन्सॉर बोर्डाच्या १२ सदस्यांनी शनिवारी आपल्या पदांचा सामूहिक राजीनामा दिलाय. तर बोर्डाचे सदस्य यूपीएचे असून ते राजकारण करत असल्याचा आरोप अरूण जेटली यांनी केलाय. 

Jan 18, 2015, 07:31 AM IST

बलात्कार प्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुखाचा राजीनामा

महानगरपालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असतांना शिवसेनेसमोर एक नवीन अडचण उभी राहिली आहे, कारण नवी मुंबईतील शिवेसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. महिलेचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपानंतर चौगुले यांनी राजीनामा दिला असल्याचं सांगण्यात येत आहे.

Jan 9, 2015, 03:19 PM IST

कुलगुरू राजन वेळूकर यांच्या राजीनाम्यासाठी दबाव

 मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढतोय. शिवसेना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी केलीय.

Dec 11, 2014, 10:51 PM IST

'एनडीए'चं सरकार असल्याने राजीनामा नाही - गिते

लोकसभा निवडणूका आम्ही NDA म्हणून लढलो आणि जिंकलो सरकार NDAचं आहे.  राज्यातला वाद हा राज्यातला आहे. त्या संदर्भात उद्धव ठाकरे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत, असं स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी म्हटलंय, 

Nov 16, 2014, 09:43 PM IST

पर्रिकरांनंतर आर्लेकर होणार गोव्याचे मुख्यमंत्री?

गोव्याचे मुख्यंत्री मनोहर पर्रीकर उद्या म्हणजेच शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. यानंतर गोव्याची सूत्रं कुणाच्या हातात जातील? खलबतं सुरू आहेत.

Nov 7, 2014, 05:26 PM IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर देणार राजीनामा

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर येत्या शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचं समजतंय...

Nov 6, 2014, 08:24 PM IST

राज ठाकरे संतापलेत, नगरसेवकांचे बंड म्यान

नाशिकमध्ये राजकीय नाट्य वेगळ्याच वळणावर आले आहे. मनसेच्या बालेकिल्ल्यात बंडखोरीची लागण झाली. अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्त्र उगारले. मात्र, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तात्काळ या पदाधिकाऱ्यांचे राजीनामेच स्वीकारले. माजी आमदार वसंत गीते यांनी सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता. त्याच पद्धतीने राज यांनी धक्कातंत्र वापरत राजीनामा स्वीकारला.

Nov 5, 2014, 07:18 AM IST