काँग्रेसला धक्का: जयंती नटराजन यांचा ना'राजीनामा'

काँग्रेस आता पूर्वीसारखा पक्ष राहिलेला नाही, पक्षात घुसमट होत असून अशा वातावरणात काम करता येणार नाही, असं सांगत माजी केंद्रीय मंत्री जयंती नटराजन काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.  

Updated: Jan 30, 2015, 09:20 PM IST
काँग्रेसला धक्का: जयंती नटराजन यांचा ना'राजीनामा' title=

नवी दिल्ली: काँग्रेस आता पूर्वीसारखा पक्ष राहिलेला नाही, पक्षात घुसमट होत असून अशा वातावरणात काम करता येणार नाही, असं सांगत माजी केंद्रीय मंत्री जयंती नटराजन काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. मात्र अन्य पक्षात जाण्याचा विचार नसल्याचं नटराजन यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. नटराजन यांच्या राजीनाम्यामुळं काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. 

नटराजन यांनी पक्षनेतृत्वाला पाठवलेलं एक पत्र उघड झाल्यानं काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे. स्वत:ची बाजू मांडण्यासाठी नटराजन यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर आरोप केले. माझ्यासाठी आजचा दिवस अतिशय दु:खदायक आहे, आपलं कुटुंब गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेससोबत आहे. फाईल्स मंजुरीसाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. नोव्हेंबर महिन्यात आपण बाहेर असताना अजय माकन यांनी आपल्याला फोन करून दिल्लीला बोलावलं आणि मला मोदींविरोधात स्नूपगेटवरून टीका करण्यास सांगितलं. 

मला वैयक्तिक टीकेपेक्षा त्यांच्या नीतींबाबत टीका करणं योग्य वाटत होतं, मात्र तसं करता आलं नाही, असंही त्या म्हणाल्या. माझी तामिळनाडू काँग्रेसबद्दल कोणतीच तक्रार नाही, माझी तक्रार हायकमांडबद्दल आहे. मला पक्षाध्यक्षांना भेटण्याची वेळच दिली नाही, असं सांगत त्यांनी काँग्रेसमध्ये लोकशाही नसल्याचा गंभीर आरोप करत पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय जाहीर केला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.