रणसंग्राम

सत्तेत राहून विरोध करण्याचे खऱे कारण सांगितले उद्धव ठाकरेंनी

 आमच्यावर टीका होते की सत्तेत राहून विरोध का करतात. तर याचं खऱं कारण मी आज सांगतो असे सांगून आपल्या विरोधाची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज अंधेरीतील सभेत स्पष्ट केली. 

Feb 9, 2017, 09:25 PM IST

मुख्यमंत्री काय म्हणाले पिंपरी चिंचवडमध्ये

पिंपरी चिंचवडमध्ये एकहाती सत्ता द्या, राष्ट्रवादी उखडू फेका. आम्ही तुमचा पूर्ण विकास करू असे आश्वासन देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिंपरी चिंचवडकरांना दिले. 

Feb 9, 2017, 08:42 PM IST

त्यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही - मुख्यमंत्री

आजकाल मी किती पाणी पितो तेही ते मोजतात, पण मी त्यांना या निवडणुकीत पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही असा घणाघाती टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. 

Feb 9, 2017, 07:52 PM IST

भाजप सरकारमधून सेनेला हकलून देईल - पृथ्वीराज चव्हाण

राज्यात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली असून मुख्यमंत्री शिवसेनेच्या मंत्र्यांना कधीही हाकलून देतील, आता सत्तेला सुरुंग लागण्याची केवळ औपचारिकता बाकी असल्याचं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केलंय. 

Feb 9, 2017, 07:15 PM IST

केंद्राच्या अहवालाचा सेनेकडून गैरवापर - मुख्यमंत्री

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रचारसभा भाजप खासदार किरीट सोमय्यांचा मतदारसंघ असलेल्या मुलुंडमध्ये घेतली. 

Feb 8, 2017, 08:34 PM IST

युती तुटूनही सरकारला धोका नाही - दानवे

 याआधी शिवसेना भाजप युती अनेकदा तुटली मात्र सरकारवर काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे आगामी निवडणुकांनंतरही सरकारला कोणताही धोका नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. 

Feb 8, 2017, 07:36 PM IST

मुख्यमंत्र्यांनी वळविला जिल्हा परिषदेकडे मोर्चा...

आतापर्यंत मुंबईतल्या महापालिकेच्या रणधुमाळीत व्यस्त असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्याचाच भाग म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील बीडकिन गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार सभा घेतली. 

Feb 8, 2017, 06:45 PM IST

शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही - नारायण राणे

 शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही, कारण एकदा वाघाच्या तोंडाला रक्त लागले तर तो साधे मासं खात नाही... त्यांना पैशाची चटक लागली आहे, त्यामुळे पाच वर्ष सत्तेचे रक्त पिणार असल्याने ते सत्ता सोडत नाही, असा दावा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी झी २४ तासच्या रणसंग्राम या कार्यक्रमात केला आहे. 

Feb 8, 2017, 06:35 PM IST

दादरमध्ये शाखाप्रमुख घराणेशाहीला कंटाळे, अपक्ष लढणार

 दादरमध्ये शिवसेनेत सुरू असलेल्या घराणेशाहीला कंटाळून माजी शाखाप्रमुख महेश सावंत यांनी अपक्ष अर्ज भरण्याची तयारी केलीय. 

Feb 4, 2017, 12:07 AM IST

राज्यात गुन्हेगारांना उमेदवारी, अनेक ठिकाणी हाणामारी

राज्यातल्या दहा महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांतर्फे नेत्यांच्या नातेवाईकांना तसंच गुन्हेगारांना उमेदवारी दिली गेल्याचं पाहायला मिळालं. 

Feb 3, 2017, 06:52 PM IST

मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची उलथापालथ

मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भातील बातम्या थोडक्यात... 

Feb 2, 2017, 10:55 PM IST

शिवसेनेत बंडाळी... हे आहेत बंडोबा....

उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याची वेळ जशी जवळ येतेय, तसतशी पक्षांमध्ये नाराजी आणि बंड उफाळून आलंय...मुंबईत शिवसेनेत सकाळपासून तीव्र नाराजी पसरलीय. दादर, वडाळा, लालबाग-परळ भागातल्या शिवसैनिकांमध्ये मोठी नाराजी पसरलीय.  दादार, वडाळाल्यात शिवसेनेच्या शाखांना टाळी ठोकण्यात आलीय. तर काही महत्वाच्या नगरसेवकांनी पक्षाला जय महाराष्ट्र केलाय.

Feb 2, 2017, 07:28 PM IST

राज ठाकरेंच्या 'फेकू' आरोपांवर भाजप चवताळले...

 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फेकू आरोप केले यावर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी चांगला समाचार घेतला आहे. 

Feb 2, 2017, 06:30 PM IST

मुंबईत काँग्रेसची ११५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

 मुंबई महापालिकेचे रणसंग्रामाचे बिगुल काँग्रेसने वाजवले असून सर्वात आघाडी घेतल ११५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात काही दिग्गजांच्या नावाचा समावेश आहे. 

Jan 31, 2017, 08:56 PM IST