राज्यात गुन्हेगारांना उमेदवारी, अनेक ठिकाणी हाणामारी

राज्यातल्या दहा महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांतर्फे नेत्यांच्या नातेवाईकांना तसंच गुन्हेगारांना उमेदवारी दिली गेल्याचं पाहायला मिळालं. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 3, 2017, 06:52 PM IST
राज्यात गुन्हेगारांना उमेदवारी, अनेक ठिकाणी हाणामारी  title=

मुंबई : राज्यातल्या दहा महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांतर्फे नेत्यांच्या नातेवाईकांना तसंच गुन्हेगारांना उमेदवारी दिली गेल्याचं पाहायला मिळालं. 

सोबतच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांनाही सर्वच पक्षांकडून तिकिट दिलं गेलं. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी, दहाच्या दहा महापालिकांमध्ये हाणामारीला उधाण आलं. प्रत्येक शहारात इच्छुक आणि स्थानिक पदाधिकारी यांच्यातला वाद टोकाला गेलेला पाहायला मिळाला. कुठे घेराव तर कुठे थेट हाणामारीचं चित्र होतं. 

ठाण्यात भाजपच्या खोपटमधल्या कार्यालयात नाराज घाडीगावकर समर्थक आणि विरोधक यांच्यात जोरदार हाणामारी झाली. तर तिकडे नाशिकमध्ये तिकीट न मिळालेल्या शिवसैनिकांनी नाराज होऊन, शिवसेनेचे शहरप्रमुख अजय बोरास्ते यांना जोरदार चोप दिला. 

या मारहाणीत बोरास्ते जखमी झालेत.  नागपुरात तर भाजप कार्यकर्त्यांनी त्यातही विशेषतः महिलांनी थेट गडकरींच्या घराबाहेर घोषणाबाजी केली. तसंच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव घातला.