मोबाईल

आजपासून मोबाईलवर काढा रेल्वेचं तिकीट!

आता तुम्हाला लोकलचं तिकीट अथवा पास काढण्यासाठी रांगेत उभ राहण्याची आवश्यकता नाही. आजपासून लोकलचं तिकिट  उपलब्ध असणार आहे ते तुमच्या मोबाईलवर…

Dec 27, 2014, 09:20 AM IST

बलात्कार झाल्याचा मॅसेज तिनं आरोपीलाच धाडला आणि...

दिल्लीत शुक्रवारी रात्री कॅबमध्ये बलात्काराची शिकार ठरलेल्या 'त्या' तरुणीनं आपला मित्राला मॅसेज करण्याऐवजी आरोपी ड्रायव्हर शिव कुमार यादव यालाच आपल्यावर बलात्कार झाल्याचा मॅसेज धाडला होता.

Dec 10, 2014, 11:54 AM IST

आता कोणत्याही मोबाईलवरून लॅंडलाईनवर अनलिमेटेड फ्री कॉल्स

आज मोबाईल ही एक काळाची गरज झाली आहे. परंतु त्याचबरोबर या मोबाईलचे रिचार्ज, नेट पॅक हे सामान्य माणसाच्या खिशाला न परवडणारे झाले आहेत. सगळ्या स्मार्टफोन्स यूजर्ससाठी खूप सारे अॅप्स आहेत ज्याने तुम्हाला फ्री व्हॉईस कॉलिंग करता येते. परंतु त्याला देखाल खूप साऱ्या अटी असतात त्या दोन्ही स्मार्टफोन यूजर्सकडे एकसारखच फ्री व्हाईस कॉल अॅप इन्स्टॉल असायला हवं.

Dec 9, 2014, 09:53 PM IST

गाडी चालवताना मोबाईलवर बोलाल तर १० हजारांचा दंड

अनेक वेळा मान वाकडी करून मोबाईलवर बोलणे सुरु असते. त्याचवेळी गाडीही चालविली जाते. मात्र, याला आता चांगलाच चाप बसणार आहे. गाडी चालवताना मोबईलवर बोलताना जो कोणी सापडेल त्याला तब्बल १० हजार रुपयांचा दणदणीत दंड बसणार आहे. एवढ्यावरच नाही तर पुन्हा लर्निंग लायन्सेस काढावे लागेल.

Dec 9, 2014, 06:18 PM IST

मोबाईल फोनमुळं बळावतोय ‘सर्व्हायकल स्पायनल कॉर्ड’ आजार

शाळकरी मुलांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळेच मोबाइल फोन वापरतात आणि तरुणांना तर गॅझेट्सच वेड आहे. पण ज्यापद्धतीनं हे गॅझेट्स हाताळले जातायत त्यामुळं तुम्हाला मणक्याच्या गंभीर आजारांना सामोरं जावं लागू शकतं.  

Nov 30, 2014, 10:55 AM IST

मोबाईलवरून काढा रेल्वे तिकीट आणि पास!

 रेल्वे तिकीट किंवा पास काढणे हे खूप वेळखाऊ काम... पण आता येत्या डिसेंबरपासून रेल्वे प्रवाशांची या सर्व व्यापातून सुटका होणार आहे. रेल्वे तिकीट किंवा पास आता थेट तुमच्य मोबाईलवरू मिळू शकणार आहे. 

Nov 28, 2014, 11:28 AM IST

मोबाईल हरवला! नो टेन्शन, चावी शोधेल तुमचा मोबाईल?

तुम्ही तुमचा मोबाईल कुठे विसरलात. किंवा कुठे ठेवून निघून गेलात तसेच तो हरवला, चेष्टेत कोणी तो लपवून ठेवला असेल तर काळजी करण्याचं काही कारण नाही. अशी एक चावी आहे, ती तुमचा मोबाईल शोधून देईल.

Nov 23, 2014, 02:55 PM IST

मुलींनी व्हॉट्स अॅप, फेसबुक, मोबाईल वापरायचा नाही, खापचा फतवा

उत्तर प्रदेशमध्ये खाप पंचायतीनं पुन्हा एकदा वादग्रस्त फतवा काढलाय. मुलींनी व्हॉट्स अॅप, फेसबुक, इंटरनेट, मोबाईल वापरायचा नाही, जिन्स पॅन्ट घालायचा नाही, असा निर्णय खाप पंचायतीनं घेतलाय. 

Nov 19, 2014, 01:00 PM IST

सिमकार्ड विकत घेताना आता आधार क्रमांक गरजेचा!

लवकरच मोबाईल सिम कार्ड खरेदी करताना तुम्हाला तुमच्या आधार कार्डाचा नंबर द्यावा लागू शकतो. कारण, केंद्र सरकार सध्या मोबाईल सिम कनेक्शनला आधार क्रमांकाला जोडण्याच्या विचारात आहे. 

Oct 29, 2014, 08:20 AM IST

मायक्रोसॉफ्टनं लॉन्च केला ड्युअल सिम मोबाइल फोन ‘नोकिया १३०’

मायक्रोसॉफ्ट डिव्हाइसनं आज दोन सिम असलेला मोबाइल फोन नोकिया-१३० लॉन्च केलाय. याची किंमत फक्त आणि फक्त १,६४९ एवढी आहे. 

Oct 27, 2014, 07:13 PM IST

गुगलचा स्वस्त 'अँड्रॉईड वन' भारतात दाखल

गुगलने भारतीय मोबाईल फोन निर्माता कंपनींसोबत तीन स्वस्त अँड्रॉईड स्मार्टफोन लॉन्च केले आहेत, हे तीनही फोन गुगलच्या 'अॅड्रॉएड वन' चा भाग आहेत. 

Sep 15, 2014, 05:16 PM IST

आयफोन ६ला टक्कर देण्यासाठी सॅमसंग आणणार दोन फोन

 दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग आपल्या प्रतिस्पर्धी अॅपलच्या आयफोनला टक्कर देण्यासाठी दोन नवीन फोन बाजारात आणणार आहे. हे दोन्ही प्रिमियम सेगमेंटचे हँटसेट असणार आहेत. दिवाळीपूर्वी हे फोन बाजारात येण्याची शक्यता आहे. 

Sep 12, 2014, 07:36 PM IST