मुलींनी व्हॉट्स अॅप, फेसबुक, मोबाईल वापरायचा नाही, खापचा फतवा

उत्तर प्रदेशमध्ये खाप पंचायतीनं पुन्हा एकदा वादग्रस्त फतवा काढलाय. मुलींनी व्हॉट्स अॅप, फेसबुक, इंटरनेट, मोबाईल वापरायचा नाही, जिन्स पॅन्ट घालायचा नाही, असा निर्णय खाप पंचायतीनं घेतलाय. 

Updated: Nov 19, 2014, 01:00 PM IST
मुलींनी व्हॉट्स अॅप, फेसबुक, मोबाईल वापरायचा नाही, खापचा फतवा title=

मुजफ्फरनगर: उत्तर प्रदेशमध्ये खाप पंचायतीनं पुन्हा एकदा वादग्रस्त फतवा काढलाय. मुलींनी व्हॉट्स अॅप, फेसबुक, इंटरनेट, मोबाईल वापरायचा नाही, जिन्स पॅन्ट घालायचा नाही, असा निर्णय खाप पंचायतीनं घेतलाय. 

मंगळवारी मुजफ्फरनगरच्या शाहपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शोरम गावात ३६ जातींच्या खापच्या प्रमुखांनी पंचायत घेतली. या पंचायतीत काढल्या गेलेल्या फतव्यानुसार मुलींच्या व्हॉट्स अॅप, फेसबुक, इंटरनेट, मोबाईलचा वापर आणि जिन्स घालण्यावर बंदी घालण्यात आलीय. मुलींना या सर्व वस्तूंपासून दूर राहण्यास सांगितलंय. 

खापनं निर्णय घेत सांगितलं की १८ वर्षांनंतर मुलगा किंवा मुलीला मोबाईल द्यायला पाहिजे. त्यापूर्वी ते फेसबुक पाहतात, व्हॉट्स अॅप पाहतात, पॉर्न फिल्म्स पाहतात. याचा गैरवापर होतोय म्हणून यावर बंधन घालायला हवं. निर्णयात सांगितलं गेलंय की, इंटरपर्यंतच्या मुलींना मोबाईलची गरज नाही. त्यांनी जिन्स घालू नये. फेसबुकवर मैत्री, प्रेम होतं आणि तुटतं हे चांगलं नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.