मोबाईलवरून काढा रेल्वे तिकीट आणि पास!

 रेल्वे तिकीट किंवा पास काढणे हे खूप वेळखाऊ काम... पण आता येत्या डिसेंबरपासून रेल्वे प्रवाशांची या सर्व व्यापातून सुटका होणार आहे. रेल्वे तिकीट किंवा पास आता थेट तुमच्य मोबाईलवरू मिळू शकणार आहे. 

Updated: Nov 28, 2014, 11:28 AM IST
मोबाईलवरून काढा रेल्वे तिकीट आणि पास! title=

मुंबई :  रेल्वे तिकीट किंवा पास काढणे हे खूप वेळखाऊ काम... पण आता येत्या डिसेंबरपासून रेल्वे प्रवाशांची या सर्व व्यापातून सुटका होणार आहे. रेल्वे तिकीट किंवा पास आता थेट तुमच्य मोबाईलवरू मिळू शकणार आहे. 
टेक्नोसॅव्ही रेल्वे प्रवाशांना आता रेल्वे तिकीट किंवा पास काढणे डाव्या हाताचा खेळ होणार आहे. रेल्वे प्रवाशांकडील अँड्राइड किंवा विंडो सिस्टीम असलेल्या मोबाइलवर रेल्वेचे अॅप डाऊनलोड करून घ्यावे लागेल. ब्लॅकबेरी आणि आयफोनवर ही सुविधा अद्याप उपलब्ध नाही. पण काही दिवसांनी उपलब्ध करून दिली जाईल. स्मार्ट फोन नसलेल्या रेल्वे प्रवाशांना १३९ या क्रमांकावर संपर्क साधून ही सुविधा मिळेल. 

तिकिटाचे पैसे भरण्यासाठी रेल्वेने 'आर वॉलेट' ही योजना सुरू केली आहे. त्याचे पैसे ऑनलाइन किंवा तिकीट खिडक्यांवर आधी भरावे लागतील. काही निवडक रेल्वे स्टेशनवरील प्रिंटरमधून ही तिकिटे किंवा पास घेता येईल. मोबाइलवर तिकीट किंवा पास काढल्यास प्रवाशांच्या 'आर वॉलेट'ममधून पैसे वजा होतील त्यानंतर प्रवाशाच्या मोबाइलवर एक एसएमएस कोड येईल. रेल्वे स्टेशनवरील प्रिंटरवर एसएमएस कोड टाईप केल्यावर प्रिंटरमधून तिकीट अथवा पास प्रवाशाच्या हातात मिळेल. 

मध्य रेल्वेच्या सीएसटी, दादर, कुर्ला, ठाणे आणि कल्याण स्टेशनवर तर पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट, मुंबई सेंट्रल, दादर, अंधेरी आणि बोरीवली स्टेशनवर प्रिंटर ठेवले जातील. त्यातून तिकीट आणि पासचा प्रिंटआऊट प्रवाशांना घेता येईल. ही योजना एक वर्षांसाठी प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणार आहे. 

स्मार्ट फोन नसलेल्या प्रवाशांना मोबाइल फोनवर *139# हा क्रमांक डायल केल्यास ही सुविधा मिळेल.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.