महायुती

चर्चेचं गुऱ्हाळ संपेना: भाजपचा नवा फॉर्म्युला शिवसेना मान्य करणार?

गेल्या दोन दिवसांपासून शिवसेना-भाजपा युतीमधील चर्चेचं गुऱ्हाळ सुरुच आहे. शिवसेनेनं देऊ केलेला 126 जागांचा प्रस्ताव भाजपानं फेटाळला असून, १३०-१४०-१८ असा नवा फॉर्म्युल्याचा प्रस्ताव आता भाजपनं शिवसेनेला दिलाय.  

Sep 21, 2014, 08:33 AM IST

महायुती नाट्यावर आबांची खोडी, शिवसेनेला सहानुभूती

 महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील यांनी महायुतीतील नाट्यात शिवसेनेबद्दल सहानुभूती दर्शवून खोड़ी काढली आहे. झी २४ तासवरील रोखठोक आबा या कार्यक्रमात ते बोलत होते.  महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील यांनी महायुतीतील नाट्यात शिवसेनेबद्दल सहानुभूती दर्शवून खोड़ी काढली आहे. झी २४ तासवरील रोखठोक आबा या कार्यक्रमात ते बोलत होते. 

Sep 19, 2014, 04:22 PM IST

महायुती नाही ही तर महाकुस्ती - सचिन सावंत

महायुती नाही ही तर महाकुस्ती - सचिन सावंत

Sep 19, 2014, 12:50 PM IST

भाजपची मुंबईत पोस्टरबाजी, महायुतीबाबत टाळला उल्लेख

 भाजपानं स्वबळावर निवडणुका लढवायची तयारी केलीय की काय? अशी शंका येण्याचं कारण म्हणजे भाजपनं सध्या मुंबईत केलेली पोस्टरबाजी. या पोस्टरवर भाजपला मते द्या, एवढाच उल्लेख आहे. राज्यातील युती तसेच महायुतीबाबत काहीही दिसत नाही.

Sep 18, 2014, 09:56 PM IST

महायुतीचा चेंडू भाजपकडून शिवसेनेच्या कोर्टात

 महायुतीच्या जागावाटपाचा चेंडू भाजपनं शिवसेनेच्या कोर्टात टोलवलाय. भाजपनं दोन पावलं पुढं टाकली आहेत. शिवसेनेनंही दोन पावलं पुढं यावं असं सांगत युती तोडायची की शाबूत ठेवायची याचा फैसला भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेनेवर सोपवलाय. 

Sep 18, 2014, 06:22 PM IST

अमित शहांचा भाजपयुक्त महाराष्ट्राचा नारा, युतीबाबत उल्लेख टाळला

भाजपनं एका बाजुला महायुतीच्या जागावाटपाची चर्चा करण्याचा सूर लावला असला तरी दुस-या बाजुला मात्र स्वतंत्र प्रचार सुरू केलाय. भाजप अध्यक्ष अमित शाह प्रचारसभेतल्या भाषणांमध्ये काँग्रेसयुक्त भारतासोबत भाजपयुक्त महाराष्ट्राचा नारा दिला आहे. गावा-गावात जाऊन भाजप कार्यकर्त्यांचं जाळं सशक्त करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्यात.  त्यांच्या कोल्हापूर आणि चौंडीतल्या भाषणांमध्ये महायुतीचं सरकार असा कुठेही उल्लेख नव्हता.

Sep 18, 2014, 06:01 PM IST

मन मोठं करा, युती तोडू नका - राजू शेट्टी

मन मोठं करा, युती तोडू नका - राजू शेट्टी

Sep 17, 2014, 04:10 PM IST