रणशिंंगानंतरही, महायुती-आघाडीच्या घरात आदळआपट

महायुतीतला जागावाटपाचा तिढा अजूनही सुटण्याची चिन्ह नाहीत. जागावाटपाचा जुनाच फॉर्म्युला कायम राहील अशी ठाम भूमिका शिवसेनेनं घेतलीय. 

Updated: Sep 14, 2014, 04:42 PM IST
रणशिंंगानंतरही, महायुती-आघाडीच्या घरात आदळआपट title=

मुंबई : महायुतीतला जागावाटपाचा तिढा अजूनही सुटण्याची चिन्ह नाहीत. जागावाटपाचा जुनाच फॉर्म्युला कायम राहील अशी ठाम भूमिका शिवसेनेनं घेतलीय. 

महायुतीची भांडाभांडी
अधिक जागा हव्या असतील तर विधानसभेच्या एकूण जागा वाढवाव्या लागतील असा खोचक टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला लगावलाय.  तर राऊत हे काही शेवटचे अधिकारी व्यक्ती नसल्याचा प्रतिटोला भाजप प्रवक्ते माधव भंडारी लगावलाय. जागावाटपाची चर्चा वरच्या स्तरावर सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. 

जागावाटपाचा तिढा महायुती आणि आघाडीतही कायम असल्याचं चित्र अजूनही कायम आहे. काँग्रेस आणि भाजपनं पहिली यादी जाहीर करण्याची घोषणा करून, मित्रपक्षांवर दबाव टाकायला सुरूवात केल्याचं दिसतंय. येत्या 2 ते 3 दिवसांत भाजप आपल्या 70 ते 80 उमेदवारांची घोषणा करेल, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी स्पष्ट केलंय. 

आघाडीची आदळआपट
तर राष्ट्रवादी काँग्रेसला जागा वाढवून देण्याचे संकेत पक्षश्रेष्ठींनी दिलेले नाहीत, असं माणिकराव ठाकरेंनी स्पष्ट केलंय. तसंच 17 सप्टेंबरपर्यंत काँग्रेसची पहिली यादी जाहीर होईल असं माणिकराव ठाकरे यांनी सांगितलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.