महागाई

तुरडाळीचा दर २०० रुपये, पुन्हा महागाई डोके वर काढणार?

तुरडाळीच्या दराने २०० रूपयांचा दर गाठला असताना डाळीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारकडून कुठलीही ठोस पावलं उचलली जात नसल्याचं चित्र आहे. एकीकडे डाळीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीने सरकारला विविध उपाय सुचवले आहेत. अत्यावश्यक वस्तू कायदा लागू करण्याची मागणीही केली आहे. मात्र सरकारकडून याला कोणताच प्रतिसाद मिळत नाहीये. 

Apr 20, 2016, 10:49 PM IST

आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतो अच्छे दिन येणार पण...

वर्षाचं बजेट सादर करण्याआधी अर्थमंत्री अरुण जेटलींनी लोकसभेमध्ये आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला.

Feb 27, 2016, 03:47 PM IST

महागाई वाढण्याचं खरं कारण

(जयवंत पाटील, झी २४ तास) महागाई वाढली, तूरदाळ वाढली, टॉ़मॅटो महागला, पालेभाज्या महागल्या असं सर्वत्र वाचण्यात येत आहे. न्यूज पेपर्स, न्यूज चॅनेल्स यात मागे नाहीत. पण महागाई का वाढतेय, याचं उत्तर शोधण्यास कुणीही तयार नाही.

Nov 19, 2015, 02:14 PM IST

प्रवाशांच्या फुकटेपणावर रेल्वेचा चाप, तिकीटाचे किमान दर आता १० रु.

रेल्वेनं दुसऱ्या दर्जाच्या तिकीट दरात वाढ केलीय. या तिकीटाचे किमान दर पाच रुपयांवरून दहा रुपये करण्यात आलेत. प्रवासी भाड्यातली ही वाढ फक्त सर्वसाधारण तिकीटासाठीच झालीय. वाढलेले तिकीट दर लोकल ट्रेन्ससाठी लागू होणार नाहीत. 

Nov 18, 2015, 09:37 AM IST

दिवाळीनंतर निघणार दिवाळं, पेट्रोल-डिझेल महागलं

दिवाळी संपताच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असून पेट्रोलच्या दरात प्रति लीटरमागे ३६ पैसे तर डिझेलच्या दरात प्रति लीटरमागे ८७ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. आज मध्यरात्री १२ वाजेपासून ही नवीन दरवाढ लागू होणार आहे. 

Nov 15, 2015, 06:36 PM IST

सर्वांसाठी बॅड न्यूज, दिवाळीनंतर सर्वांचे 'दिवाळं'

केंद्र सरकार येत्या १५ नोव्हेबरपासून सर्व्हिस टॅक्सवर अर्धा टक्के सेस लागू करणार आहे. त्यामुळे सर्व वस्तू आणि सेवा महागणार आहे. त्यामुळे येत्या दिवाळीनंतर सर्वांचं दिवाळं होणार आहे. 

Nov 6, 2015, 08:48 PM IST

महागाईच्या विरोधातील सर्वपक्षीय खदखद रस्त्यावर

वाढत्या महागाई विरोधात शिवसेनेनेही आंदोलन केल. रिलायन्स मॉलच्या बाहेर तूरडाळ विकून शिवसेनेनं आपला निषेध व्यक्त केला. 

Oct 20, 2015, 04:07 PM IST

महागाईविरोधात सर्वपक्षीय आंदोलन, थाळी-लाटणे मोर्चाचे आयोजन

वाढत्या महागाईला आळा घालण्यात राज्य तसेच केंद्र सरकारला मोठे अपयश आलेय. या महागाई विरोधात आज सर्वपक्षीय आंदोलन पुकारण्यात आले आहे. 

Oct 20, 2015, 12:59 PM IST