प्रवाशांच्या फुकटेपणावर रेल्वेचा चाप, तिकीटाचे किमान दर आता १० रु.

रेल्वेनं दुसऱ्या दर्जाच्या तिकीट दरात वाढ केलीय. या तिकीटाचे किमान दर पाच रुपयांवरून दहा रुपये करण्यात आलेत. प्रवासी भाड्यातली ही वाढ फक्त सर्वसाधारण तिकीटासाठीच झालीय. वाढलेले तिकीट दर लोकल ट्रेन्ससाठी लागू होणार नाहीत. 

Updated: Nov 18, 2015, 04:35 PM IST
प्रवाशांच्या फुकटेपणावर रेल्वेचा चाप, तिकीटाचे किमान दर आता १० रु. title=

नवी दिल्ली: रेल्वेनं दुसऱ्या दर्जाच्या तिकीट दरात वाढ केलीय. या तिकीटाचे किमान दर पाच रुपयांवरून दहा रुपये करण्यात आलेत. प्रवासी भाड्यातली ही वाढ फक्त सर्वसाधारण तिकीटासाठीच झालीय. वाढलेले तिकीट दर लोकल ट्रेन्ससाठी लागू होणार नाहीत. 

आणखी वाचा - रेल्वेचे तिकिट कॅन्सल दर दुप्पट, नवे नियम लागू

त्यामुळं आता रेल्वेचं कमीत कमी तिकीट हे दहा रुपये इतके असेल जे पूर्वी पाच रुपये होतं. हे नवीन तिकीट दर २० नोव्हेंबरपासून लागू होतील. प्लॅटफॉर्म तिकीट आणि प्रवासी तिकीट यांच्या किंमतीत समानता असावी यासाठी ही वाढ केल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलंय. 

आणखी वाचा - रेल्वेनं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी...

प्लॅटफॉर्म तिकीटाची किंमत आधी पाच रुपयांवर दहा रुपये करण्यात आली. त्यानंतर अनेक प्रवासी दहा रुपयांचं प्लॅटफॉर्म तिकीट काढण्याऐवजी ५ रुपयांचे जनरल तिकीट काढत होते. मात्र आता रेल्वेच्या नव्या तिकीट दरामुळं प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल असं रेल्वेला वाटतंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.