महागाई

थडीचा कडाक्यात अंड्याच्या महागाईचा भडका

वाढती थंडी आणि महाग झालेल्या भाज्या यामुळे एरवी स्वस्त समजल्या जाणाऱ्या अंड्यांचाही भाव वधारलंय. दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागली आणि त्याचबरोबर किरकोळ बाजारात पाच रुपयांना मिळणाऱ्या अंड्याची किंमत आता सहा रुपये झालीय. 

Nov 15, 2017, 08:53 PM IST

सात महिन्यात गगनाला भिडली महागाई , भाजीपाला दरात वाढ

खाण्यापिण्याच्या खासकरुन भाज्यांचे भाव तेजीने गगनाला भिडले आहेत. बघता बघता ऑक्टोबर महिन्यात हा तर ३.५८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

Nov 13, 2017, 10:07 PM IST

भाज्यांचे दर भिडले गगनाला, लोकांचे मासिक बजेट कोलमडण्याची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेल्या भाज्यांच्या दरांमुळे अनेकांच्या घरचे मासिक बजेट कोलमडले आहे. साधारण एक महिन्यांपूर्वी ८० रूपये प्रति किलो दराने विकल्या जाणाऱ्या भाज्या चक्क ९० ते १०० रूपये किलो दराने विकल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले असून, विक्रेत्यांनाही माल कसा खपवायचा हा प्रश्न पडला आहे.

Oct 28, 2017, 05:02 PM IST

कांदा ६० रूपये किलो; व्यापाऱ्यांना अच्छे दिन, ग्राहकांच्या डोळ्यात पाणी

पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले असतानाच कांदा हा बाजारपेठेतला अत्यंत दुर्मीळ पदार्थ ठरला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना अच्छे दिन तर, ग्राहकांच्या डोळ्यात पाणी अशी स्थिती बाजारात निर्माण झाली आहे. कांद्याच्या दराने सध्या पन्नाशी पार केली आहे.

Oct 24, 2017, 08:58 AM IST

दिवाळीच्या तोंडावर बाजारपेठा फुलल्या, महागाईने जनता त्रस्त

दिवाळीच्या सणाला काही तासच बाकी असल्यामुळे शहरांसह राज्यातील विविध बाजारपेठा फुलल्या आहेत. नागरिकांनीही खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली आहे. मात्र, वाढत्या महागायीचा खिशावर पडणारा बोजा विचारात घेऊन ग्राहक हात आकडता घेत असल्याचे चित्र आहे.

Oct 15, 2017, 11:08 AM IST

औरंगाबादमध्ये शिवसेनेचं महागाईविरोधात अनोखं आंदोलन

एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असताना आता गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्य जनतेचं कंबरड मोडलं आहे. वाढत्या महागाई विरोधात शिवसेनेने आंदोलन केलं आहे.

Oct 2, 2017, 09:34 PM IST

जालन्यात वाढत्या महागाईविरोधात धडक मोर्चा

गेल्या तीन वर्षात पेट्रोल, डिझेल, गॅसचे वाढलेले भाव, सतत वाढणारी महागाई आणि कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या पदरात पडण्यास होणारा उशीर याविरोधात आज जालना जिल्हा शिवसेनेच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला. 

Sep 28, 2017, 07:09 PM IST

महागाईविरोधात आता मनसेही मैदानात उतरणार

वाढत्या महागाईविरोधात आता मनसेही रस्त्यावर उतरणार आहे. 

Sep 27, 2017, 03:26 PM IST