मराठी भाषा

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी....

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी एक ऑनलाईन मोहिम चालवली जात आहे, केंद्र सरकारपर्यंत हा आवाज पोहोचवण्यासाठी #अभिजातमराठी ही मोहिम आखण्यात आली आहे. https://goo.gl/KDDsbE या लिंकवर जाऊन आपण मतदान करा, तसेच तुम्ही विचारही व्यक्त करू शकतात. शक्य तितक्या मराठी प्रिय लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवा.

Feb 21, 2016, 09:12 PM IST

'मराठी भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा देण्याची गरज'

 घुमान इथं सुरु असलेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप झाला. मराठी भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा देण्याची गरज आहे असं मत यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय.. तसंच राजकीय संमेलनं नको असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणालेत.

Apr 5, 2015, 11:18 PM IST

मराठी भाषेतला पहिला शिलालेख होतोय इतिहास जमा

 मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असतना दुसरीकडे मराठी भाषेतला पहिला शिलालेख मात्र आजही धूळ खात पडलाय. जागतीक मराठी भाषा दिनानिमित्ती या शिलालेखावरील धूळ झटकण्याचा आणि राज्य शासनाचे डोळे उघण्याचा हा छोटासा प्रयत्न.

Feb 27, 2015, 11:51 AM IST

सहा दशकांनंतर लढ्याला यश, मराठीला अभिजात दर्जा!

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार आहे. साहित्य अकादमीनं केंद्रसरकारला याबाबत एक पत्र पाठवलंय. २७ फेब्रुवारी या ‘मराठी भाषा दिना’पूर्वी याची घोषणा होणार आहे. 

Feb 8, 2015, 07:13 PM IST

विनोद तावडे यांचा राज ठाकरेंना टोला

राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे, काही नेते मराठी पाट्यांसाठी आग्रह धरतात, मात्र त्या दुकानांचे मालक मराठी कसे होतील यावर जोर देण्याची गरज असल्याचं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.

Dec 15, 2014, 12:00 AM IST

आमिरच्या मनाची श्रीमंती अन् मराठीचा कळवळा

मराठी भाषा टिकावी, यासाठी आपण नेहमीच गळे काढतो... जागतिक बदलांमध्ये मराठी भाषेला महत्त्वाचं स्थान मिळावं, यासाठी परिषदा आणि बैठकांमध्ये तासन् तास खल करतो. त्यामुळंच की काय, आमिर खानसारख्या हिंदी सिने अभिनेत्यांनाही मराठीची गोडी लागते. परंतु अमृताते पैजा जिंकणा-या मराठी भाषेबद्दल मुंबई विद्यापीठाला किती कळवळा आहे? जाणून घ्यायचंय... पाहूयात हा विशेष रिपोर्ट...

Feb 17, 2014, 09:44 PM IST

२१ अधिकाऱ्यांना दणका, आधी मराठी शिका! मगच...

महाराष्ट्रात राहणाऱ्यांना आणि काम करणाऱ्यांना मराठी येणे आवश्यक आहे, ही काही राजकीय पक्षांची मागणी योग्य आहे. हे आता अधोरेखीत झाले आहे. राज्यात प्रशासकीय काम करणाऱ्या २१ आयपीएस अधिकाऱ्यांना मराठी न आल्याने त्याचा फटका बसला आहे. आधी मराठी शिका मगच पगार, असे स्पष्ट बजावत या अधिकाऱ्यांना दणका दिलाय.

Jul 31, 2013, 10:43 AM IST

अमराठी भाषिकांना पुणे विद्यापीठाची साथ

अमराठी भाषकांना मराठी भाषा शिकण्यासाठी पुणे विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. मराठी शिकविण्यासाठी त्यांना साथ देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी खास अभ्यासक्रम सुरू केला आहे.

Jun 4, 2013, 07:45 PM IST

झी २४ तासच्या बातम्या आता तुमच्या बोलीभाषेत

महाराष्ट्रातील आघाडीची वृत्तवाहिनी असलेल्या ‘झी 24 तास’वर जागर बोलीभाषेचा हा अनोखा उपक्रम सुरु करण्यात आला असून दर बुधवारी एका बोलीभाषेतून त्या भागातील बातम्या प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. या बुधवारी मालवणी भाषेतून या उपक्रमाची सुरुवात होणार असून गणपती उत्सवाच्या तयारीत दंग असलेल्या मालवणी मुलखातील खबरबात खास मालवणी बोलीतील बातम्यांमधून सादर केली जाणार आहे.

Sep 11, 2012, 11:53 PM IST

प्रियंका चोप्राही शिकणार 'मराठी'!

‘स्वीटी’च्या आणि ‘काली’च्या भूमिकेत बघितल्यावर अजूनही तिचे फॅन्स तिला मराठी मुलीच्या भूमिकेत पाहण्यास उत्सुक आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करून ‘युपी’च्या प्रियंकाने आता कामचलाऊ मराठी न बोलता नीट मराठी शिकण्याचा निर्णय घेतला आहे.

Jan 31, 2012, 06:29 PM IST

सकारात्मक प्रांतवाद असावा...

दीपक पवार

राजकीय विश्लेषक

निरुपमसारख्या नेत्यांबद्दलच बहुतेक तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलंय ‘तुका म्हणे ऐशा नरा, मोजुनी माराव्या पैजारा’. पण, महाराष्ट्रातल्या पक्षांनी प्रांतवादाचं प्रतिक्रियात्मक राजकारण थांबू नये. यापलीकडे जाऊन त्यांना मराठी भाषेसाठी सकारात्मक राजकारण करावं लागेल.

Nov 3, 2011, 06:24 PM IST