मुंबई : राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे, काही नेते मराठी पाट्यांसाठी आग्रह धरतात, मात्र त्या दुकानांचे मालक मराठी कसे होतील यावर जोर देण्याची गरज असल्याचं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.
तसेच मराठी भाषेला २७ फेब्रुवारीपर्यंत अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणार असल्याचंही विनोद तावडे यांनी सांगितलं यासाठी राज्य सरकारचे विशेष प्रयत्न सुरू असल्याचं विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं आहे.
एकंदरीत भाजपाने पुन्हा एकदा आपला मोर्चा मराठी भाषेकडे वळवला असल्याचं दिसून येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.