मराठा मोर्चा

मराठा मोर्चावर आयोजकांची पुढील भूमिका

मराठा क्रांती मोर्चा आयोजकांनी आज औरंगाबादेत पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिकेविषयी माहिती दिली. जिल्हा आणि तालुकास्तरीय मोर्चे सुरूच राहतील. मात्र सध्या मुंबईतील मोर्चाला आम्ही स्थगिती देण्यात आली आहे.

Oct 9, 2016, 08:59 PM IST

'तर मातोश्रीच्या अंगणात दसरा मेळावा झाला असता'

सामनातील व्यंगचित्राबाबत माफ़ी मागितली नसती तर 'मातोश्री' च्या अंगणात दसरा मेळावा घ्यावा लागला असता अशा शब्दात काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेतृत्वाची खिल्ली उडवली आहे.

Oct 8, 2016, 08:26 PM IST

पुण्यातील विमानतळाला छत्रपती संभाजी राजे यांचे नाव...

पुण्याजवळ पुरंदर येथे नवीन विमानतळाला मंजुरी मिळाल्यानंतर आज मराठा मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विमान तळाला छत्रपती संभाजी राजे यांचे नाव देणार असल्याचे जाहीर केले. 

Oct 6, 2016, 09:28 PM IST

मराठा मोर्चा | पहिला बंद पुकारणाऱ्या संजीव भोर यांना कारणे दाखवा

राज्यात मराठा मोर्चाचं वादळ सुरू असतानाच, कोपर्डीच्या घटनेनंतर सर्वात पहिला बंद पुकारणाऱ्या संजीव भोर पाटील यांना सहा जिल्ह्यात प्रवेश बंदी का करू नये, याविषयी कारणे दाखवा नोटीस देण्यात आलीय. 

Oct 4, 2016, 08:03 PM IST

शिवसेनेचा उशीराचा माफीनामा !

लाखोंच्या संख्येनं सुरू असलेले मराठा मोर्चे आताच्या आणि आधीच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असले तरी शिवसेनेच्या विरोधात त्यांचा फारसा राग नव्हता आणि त्यामुळे इतरांना कुणाला तोटा झाला असता तरी शिवसेनेला काहीप्रमाणात का होईना फायदाच झाला असता.... मात्र 'सामना'मध्ये मराठा मोर्चाविषयी छापण्यात आलेल्या कार्टूनमुळे एकदम चित्रच पालटलं आणि शिवसेनेच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली...

Oct 3, 2016, 07:22 PM IST

मुख्यमंत्री-शरद पवार यांच्यात मराठा आरक्षणावरून खलबतं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यामध्ये सह्याद्री अतिथीगृहावर तब्बल अर्धा तास चर्चा झाली आहे.

Oct 2, 2016, 10:30 PM IST

अॅट्रॉसिटीत सुधारणा आवश्यक; जातीवर आरक्षण नको-राज

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात गडकरी रंगायतमध्ये मनसेच्या कार्य़कर्त्यांना संबोधित केलं, यावेळी पहिल्यांदा राज ठाकरे य़ांनी ग्रामीण भागावर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सडेतोड मुद्दे उपस्थित केले.

Oct 2, 2016, 09:03 PM IST

उद्धव ठाकरेंनंतर आता संजय राऊत यांचा माफीनामा

दैनिक सामनातील वादग्रस्त व्यंगचित्राप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ आता सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही दिलगिरी व्यक्त केली आहे.

Oct 2, 2016, 04:46 PM IST

'मुका मोर्चा'वरुन नारायण राणेंचा शिवसेनेवर जोरदार 'प्रहार'

राज्यात मराठा आरक्षणाबाबत निघणारे मराठे मोर्चे आणि शिवसेनेच्या मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका व्यंगचित्रामुळे शिवसेनेच्या गोटात वादळ उठले. मात्र, हे वादळ क्षमण्याचे नाव घेत नाही. विरोधकांनी शिवसेनेला खंडीत पकडण्याची संधी सोडलेली नाही. काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार 'प्रहार' केलाय.

Sep 29, 2016, 09:52 AM IST