NPCI on World Uses UPI: भारतातील घराघरामध्ये यूपीआय पोहोचले आहे. रस्त्यावरील छोट्या दुकानदारांपासून मॉलमधील मोठ्या शॉप्सपर्यंत सगळीकडे पैशांच्या व्यवहारासाठी यूपीआयचा वापर केला जातोय. भारतात आपले स्थान निर्माण केल्यानंतर यूपीआय आता ते ग्लोबल होणार आहे. त्यामुळे भारताचा यूपीआय सुपरहीट झाला आहे. यूपीआय मॅनेजमेंट करणाऱ्या एनपीसीायच्या विदेशी कंपनी एनआयपीएलने पेरु आणि नामिबीयाच्या सेंट्रल बॅंकांसोबत यूपीआय सारखी सिस्टिम डेव्हलप करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.
एनआयपीएल (NPCI International Payments Ltd) चे सीईओ रितेश शुक्ला यांनी महत्वाची माहिती दिली आहे. त्यानुसार आफ्रीका आणि साऊथ अमरिकेच्या अनेक देशांमध्ये यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (Unified Payments Interface) ची ब्लूप्रिंट तयार करण्यात आली आहे. पेरु आणि नामीबियामध्ये यूपीआयची लॉन्चिंग 2027 मध्ये होण्याची शक्यता आहे. एनपीसीआय ही देशातील रिटेल पेमेंट सिस्टिमची रेग्युलेटरी संस्था आहे. ही संस्था देशात यूपीआय चालवते. ऑगस्टमध्ये 15 अरब यूपीआय व्यवहार झाले आहेत.
भारताची यूपीआय जगभरात पोहोचवण्यासाठी एनपीसीआयने एनआयपीलची स्थापना केली. एका रिपोर्टनुसार, एनआयपीएल सध्या आफ्रीका साऊथ अमेरिकेतील 20 देशांमध्ये यूपीआयसंबंधी चर्चा करत आहे. रितेश शुक्लांनी दिलेल्या माहितीनुसार, पेरु आणि नामीबीयाच्या सेंट्रेल बॅंकांसोबत आमची या वर्षाच्या सुरुवातीलाच चर्चा झाली आहे. या बॅंक 2026 च्या अखेरपर्यंत किंवा 2027 पर्यंत यूपीआयसारखी यंत्रणा लॉन्च करु शकतात.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रंवाडासोबतदेखील यूपीआयची गंभीर चर्चा झाली. रितेश शुक्ला आणि बॅंक ऑफ रंवाडा यांनी यावर काही बोलण्यास स्पष्ट नकार दिला. रितेश शुल्कांच्या म्हणण्यानुसार, एनआयपील इतर देशांच्या रियल टाइम पेमेंट सिस्टिमसोबत करार करत आहे. यामध्ये सिंगापूरच्या पेनाऊ (Paynow)चा देखील समावेश आहे. आम्ही अशाप्रकारचे 7 सामंजस्य करार केले आहेत. एनआयपीलचे सध्या 60 सदस्य आहेत. आता मार्च 2025 मध्ये टीम वाढवली जाईल. सध्या कंपनीचे काही कर्मचारी सिंगापूर आणि मिडल इस्टच्या काही देशांत आहेत, असे ते म्हणाले.