Maharashtra Rain Update : राज्याला गेले तीन महिने झोडपून काढणारा पाऊस आता परतीच्या प्रवासातही रौद्र स्वरुप धारण केले आहे. परतीच्या पावसाने मुंबईत धुमाकूळ घातला आहे. मुंबईत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या अनुषंगाने मुंबईत कॉलेज आणि शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिल्यानंतर मुंबई पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर शाळकरी मुलांना याचा त्रास होऊ नये म्हणून शाळांना सुटी जाहीर करण्यात असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.
मुंबईला उद्या सकाळी 8.30 वाजेपर्यंत पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे, पावसाच्या जोरदार सरी बरसण्याचा अंदाज आहे. ठाण्यासह रायगड आणि पालघरमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता व्रतवण्यात आली आहे.
मुंबईमध्ये जोरदार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झालीये...मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा ते पाऊणतास उशीराने सुरूये...पश्चिम रेल्वे 20 ते 25 मिनिटे उशीराने धावतेय...तर हार्बर रेल्वे जवळपास अर्धातास उशीराने धावतेय...ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय...
मुंबईत जोरदार पाउस सुरू आहे. त्याचा परिणाम सखल भागात पाणी साचायला सुरवात झाली आहे. चिंचपोकळी परिसरातील लालबागच्या ब्रिजखाली पाणी साचले आहे त्याचा परिणाम वाहतुकीवर झालेला दिसतोय. तर शिवडीतही अनेक परिसर जलमय झालेले आहेत...