मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यामध्ये सह्याद्री अतिथीगृहावर तब्बल अर्धा तास चर्चा झाली आहे. शनिवारी या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मराठा आरक्षणाबाबत या दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याची माहितीही मिळत आहे.