मनसेला आडकाठी, आठवले-भुजबळांच्या भेटीगाठी
नाशिक महापालिकेच्या सत्तासमीकरणांत नवे रंग भरलेत. भुजबळांनी आठवलेंना महापौरपदाची ऑफर दिली. शिवसेना-भाजप युतीचा पाठिंबा मिळाला तर तीन पक्षांच्या पाठिंब्यानं नाशिकमध्ये आठवलेंचा महापौर होऊ शकतो.
Feb 22, 2012, 10:06 PM IST'मनसे'चा झंझावात
यावेळेला ना कुठला प्रखर मुद्दा होता ना कुठलं खळ्ळ फटॅक! तरी पण प्रत्येक शहरात केवळ एकच सभा घेऊनही केवळ राज ठाकरे या नावावर मनसेला दिमाखदार असं यश लाभलं. मत विभाजन करणारा पक्ष अशी टीका करणाऱ्यांनाच आता मत खेचणारा पक्ष अस म्हणावं लागत आहे.
Feb 22, 2012, 09:47 PM ISTमनसेशी युतीला नाशिक भाजपमध्ये विरोध
नाशिक महापालिका निवडणुकीतील सत्ता स्थापनेवरून भाजपमध्ये मतभिन्नता दिसून येतेय. मनसेसोबत नवा नाशिक पॅटर्न राबविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मनसेसह सत्ता स्थापण्यासाठी एक गट अनुकूल असला तरी शिवसेनेला डावलून मनसेसोबत सत्तास्थापन करण्यास एका गटानं विरोध केलाय.
Feb 21, 2012, 07:46 PM ISTशिवसेना शाखेत पराभूत मनसे उमेदवाराचा धिंगाणा
उल्हासनगरमधल्या वॉर्ड क्रमांक २५मध्ये शिवसेनेच्या नगरसेविरका वसुधा बोडरे विजयी झाल्य़ाने संतापलेल्या पराभूत मनसे आणि अपक्ष उमेदवारानं शिवसेना शाखेत घुसून तोडफोड केली.
Feb 18, 2012, 08:49 PM ISTनाशकात नवं समीकरण, मनसे-भाजप युती?
नाशिकमध्ये सत्तेसाठी नवी समीकरणे पाहायला मिळणार आहे. मनसे आणि भाजपची युतीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे महापौर मनसेचा, उपमहापौर भाजपचा होण्याच्या वृत्ताला दुजोरा मिळत आहे. मात्र, प्रत्यक्ष नेतेमंडळीनी याबाबतचा निर्णय वरिष्ठ घेतील, असे सांगून चेंडू वरिष्ठांच्या कोर्टात भिरकावला आहे.
Feb 18, 2012, 06:29 PM ISTसेनेनं मुंबई, ठाणे 'जिंकून दाखवलं'
मुंबई महापालिकेवर गेली १७ वर्षे फडकणारा शिवसेना-भाजप युतीचा भगवा पुन्हा एकदा फडकणार आहे. शिवसेनेच्या करून दाखवलंची टिंगल केली होती. मात्र, सेनेने जे काही करून दाखवलं त्याच्याच जीवावर पुन्हा मुंबई,ठाणे पालिका जिंकून दाखवली.
Feb 18, 2012, 01:18 PM ISTपैसेवाटपावरून मनसेचा राडा
नाशिकमधील पंचवटीच्या प्रभाग क्र. १४ मध्ये मतदानाला गालबोट लावणारी घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मतदारांना पैसे वाटत असल्याच्या संशयावरून मनसैनिकांनी त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे.
Feb 16, 2012, 05:32 PM ISTराजला 'अग्निपथ' झेपला नाही - उद्धव
बाळासाहेबांसाठी शंभर पावलं पुढे येईन, असं राज ठाकरेंनी मुंबईतील कालच्या सभेत म्हंटलं होतं. त्यावर उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय. शंभर पावलं पुढे आलात तरी बाळासाहेबांचा मार्ग झेपेल का, असा सवाल शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना केला आहे. ते पुणे येथे बोलत होते.
Feb 14, 2012, 08:38 PM ISTसेना-मनसे कार्यकर्ते आमने-सामने
मुंबईत शिवसेना आणि महाराषट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यानं काही काळ तणाव निर्माण झाल्याने राडा होण्याची शक्यता होती. मात्र, पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केल्याने वातावरण शांत झाले.
Feb 14, 2012, 08:34 PM ISTराज ठाकरेंचा आघाडी, युतीवर हल्लाबोल
काम कसे करायचे याची झलक पाहायची असेल तर माझ्या हातात सत्ता द्या, मी नवा पर्याय दिला आहे. पुण्याच्या विकासासाठी मला सत्ता द्या, असे आवाहन करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी करत आघाडी, युतीवर हल्लाबोल जोरदार हल्लाबोल चढवला.
Feb 11, 2012, 11:38 PM ISTराज ठाकरेच ठरणार 'किंगमेकर' ?
येत्या महापालिका निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे किंगमेकरची भूमिका वठवतील. मुंबई पोलीस आणि राज्य गुप्तचर विभाग यांनी महापालिका निवडणुकीचा सर्व्हे रिपोर्ट तयार केला त्यात हे मांडण्यात आलं आहे.
Feb 11, 2012, 03:33 PM ISTनागपूरमध्ये नात्यांचे 'महाभारत' !
नागपूरमध्ये सर्वच पक्षांनी नेत्यांच्या सग्यासोयऱ्यांनाच तिकीटं वाटली आहेत. आई- वडील अपक्ष तर मुलगा मनसेकडून, काका विरुद्ध पुतण्या, काका विरुद्ध पुतणी अशाही लढती रंगत आहेत.
Feb 11, 2012, 03:06 PM ISTकोथरुडमध्ये कोण खेचून आणणार विजयश्री?
पुण्यातल्या कोथरुड भागातल्या प्रभाग क्रमांक २८ मधल्या बिग फाईटकडं पुणेकरांचं लक्ष लागलं आहे. दोन विद्यमान नगरसेवकांच्या लढतीसोबत कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नीही निवडणुकीच्या रिंगणात आहे.
Feb 11, 2012, 09:02 AM ISTराज ठाकरेंचा नाशिकमध्ये 'रोड शो'
पुण्यापाठोपाठ राज ठाकरेंचा आज नाशिकमध्ये रोड शो होतोय. नाशिकमध्ये १२२ जागांवर या पक्षाचे उमेदवार आहेत. चांडक सर्कलपासून या रोड शोला सुरुवात झाली आहे. दोन सत्रांमध्ये या रोड शोचं आयोजन करण्यात आलं आहे.
Feb 9, 2012, 04:26 PM ISTनाशिकमध्ये मनसे कार्यालय जाळलं
नाशिकमध्ये वाहनांचं जळीतकांड ताजं असतानाचं आता राजकीय पक्षांची उमेदवारांची प्रचार कार्यालयंही टार्गेट होऊ लागली आहेत. नाशिकच्या पवननगर भागात मनसेचं प्रचार कार्यालय जाळण्यात आलं आहे.
Feb 9, 2012, 10:52 AM IST