मनसे

कोर्टाची ताकद, अनधिकृत व्यायामशाळेवर बुलडोझर

मीरा भाईंदर महापालिकेनं कोर्टाच्या आदेशानंतर एका अनधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरवलाय. भाईंदर नवघर रोडवर अनधिकृतपणे व्यायामशाळा बांधली होती.

Mar 31, 2012, 10:17 PM IST

मनसेची 'राज'नीती

मनसेच्या इंजिनचं बळ आता काँग्रेस आघाडीला मिळणार असल्यामुळे ठाणे महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणुक चुरशीची होणार आहे. मनसेच्या या खेळीमुळं काँग्रेस आघाडीने मरगळ झटकली आहे तर शिवसेना भाजप युतीची डोकेदुखी वाढली आहे.

Mar 30, 2012, 11:53 PM IST

राजच्या निर्णयानंतर सेनेचा सावध पवित्रा

ठाण्याच्या स्थायी समिती अध्यक्षपदाचा उमेदवार अजून ठरलेला नाही, असं सांगत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी याप्रकरणी मनसेचा पर्याय खुला असल्याचे संकेत दिलेत. स्थानिक पातळीवर हे प्रश्न सुटायला हवेत हे सांगतानाच मनसे याप्रकरणी राजकारण करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

Mar 30, 2012, 02:32 PM IST

स्थायीसाठी घाई, राज भेटीला तीन सेना आमदार!

ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे तीन आमदारांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. स्थायी समितीच्या निवडणुकीत आम्हांला गृहीत धरण्यात आल्याने आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीला पाठिंबा देत असल्याचे राज यांनी स्पष्ट केल्यानंतर सेनेमध्ये धावपळ सुरू झाली.

Mar 29, 2012, 07:04 PM IST

आता माझी सटकली - राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनने ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. हा नाशिकचा वचपा नाही असं यासंदर्भात राज ठाकरे म्हणाले आहेत.

Mar 29, 2012, 04:51 PM IST

नाशिकचे महापौर करुन दाखवणार का?

नाशिक महापालिकेवर झेंडा फडकविल्यानंतर मनसेचे 'कारभारी' आता कामाला लागलेत. महापौरांनी पहिला दौरा काढला तो गोदापार्क आणि गंगाघाटाचा...राज ठाकरे यांच्या कल्पनेतला गोदापार्क साकारून दाखवू, अशी घोषणा यतीन वाघ यांनी केली आहे.

Mar 25, 2012, 05:45 PM IST

आमदार जाधवांचा मनसेला रामराम ?

औरंगाबाद जिल्ह्यात मनसेत बंडाचे वारे वाहू लागले आहेत. विश्वासात न घेता जिल्हा परिषेत आघाडीला पाठिंबा दिल्यानं आमदार हर्षवर्धन जाधव नाराज आहेत. जाधव हे मनसेला रामराम ठोकण्याची चर्चा आहे.

Mar 23, 2012, 12:47 PM IST

मनसेनेनं सत्तेसाठी करून दाखवलं

महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत मनसे किंग नसली तरी किंगमेकरच्या भूमिकेत दिसली. काल झालेल्या निवडणुकीत मनसेने पाठिंबा दिल्याने तसेच सत्तेत सहभागी होत आपणच सत्तेचं गणित बांधू शकतो हेच दाखवून दिले आहे.

Mar 22, 2012, 03:39 PM IST

सेनेला दणका, मनसेची राष्ट्रवादीला साथ

ठाणे झेडपीतही मनसेनं शिवसेनेला दणका दिला आहे. त्यामुळं ठाणे झेडपीत राष्ट्रवादीचा अध्यक्षपादाचा मार्ग सुकर झाला आहे.

Mar 21, 2012, 11:39 AM IST

सत्तेसाठी गोपीनाथ मुंडेची मनसेला हाक

औरंगाबादमध्ये शिवसेना, भाजप आणि मनसेनं एकत्र यायला हवे, असे आवाहन भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी केले आहे. मनसे आणि शिवसेनेनं भविष्यात एकत्र येण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. मनसे हा वेगळा पक्ष आहे त्यामुळे त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला बळ देण्यापेक्षा युतीसोबत यावं अशी अपेक्षा मुंडेंनी व्यक्त केली आहे.

Mar 21, 2012, 10:14 AM IST

'राज'कारण (ठाकरे) पॉवरफुल

महाराष्ट्र नव निर्माण सेनेनं महाराष्ट्राच्य़ा राजकारणात आपली वेगळं स्थान निर्माण केलं आहे. महापालिकेच्या निवडणूकीत मनसेची ताकद सर्वच राजकीय पक्षांना कळाली आहे. मनसे राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू का ठरतोय. राज ठाकरेंची प्रत्येक खेळी का यशस्वी ठरत आहे.मनसे राज्याच्या राजकारणाला भविष्यात कलाटणी देणारा का, या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत, पॉवरफुल राजकारणात.

Mar 20, 2012, 12:01 PM IST

काँग्रेसला धक्का सरवणकरांचा सेना प्रवेश पक्का

शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर उद्या पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. महापालिका निवडणुकीत दादरमध्ये सर्व जागा पराभूत झाल्यानंतर दादरचा गड ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न चालवलेत.

Mar 19, 2012, 11:06 PM IST

मनसेसाठी राष्ट्रवादीचा तिसरा उमेदवार!

राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं तिसरा उमेदवारही रिंगणात उतरवलाय. प्रकाश बिनसाळे यांनी तिसरा उमेदवार म्हणून अर्ज भरलाय. याआधी राष्ट्रवादीनं पुण्याचा माजी महापौर वंदना चव्हाण आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डी पी त्रिपाठींना उमेदवारी दिलीय.

Mar 19, 2012, 02:19 PM IST

जळगाव रुग्णालयाबाहेर सेना,मनसेचं आंदोलन

जळगावातल्या जिल्हा सरकारी रुग्णालयातल्या मेडिकल ऑफिसर डॉ.विजया चौधरी यांच्या हत्या प्रकरण आता चांगलंच तापत आहे. या हत्येप्रकरणी शिवसेना, भाजप आणि मनसे या राजकीय पक्षांनी रुग्णालयाच्या प्रशासनाला धारेवर धरलं आहे.

Mar 17, 2012, 03:07 PM IST

नाशिकमध्ये मनसेचा 'वाघ' महापौर

नाशिकच्या इतिहासातील सर्वाधिक उत्कंठापूर्वक निवडणूक म्हणून पाहत असलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाठिंबा दिल्याने यतीन वाघ हे महापौर पदावर विराजमान झाले आहेत. तर भाजपचे सतीश कुलकर्णी यांना उपमहापौर पदाची लॉटरी नव्या राजकीय समिकरणामुळे लागली आहे.

Mar 15, 2012, 03:40 PM IST