नाशिकच्या महापौरपदाचा आज निर्णय
नाशिकच्या महापौरपदाची निवडणूक आज होत आहे. सगळ्यात मोठा पक्ष असणाऱ्या मनसेनं सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. भाजपनंही मनसेला साथ देण्याचं ठरवलं आहे. मात्र शिवसेनेची भूमिका अजूनही स्पष्ट नाही.
Mar 15, 2012, 09:26 AM ISTशिवसेना मनसेला पाठिंबा देणार?
नाशिकमध्ये महापौरपदासाठी शिवसेना मनसेला पाठिंबा द्यायची शक्यता आहे. याबाबत संध्याकाळपर्यंत तिढा सुटण्याची शक्यता आहे. एकीकडे महापौरपदासाठी मनसेची मोर्चेबांधणी सुरु असताना भाजपही त्यासाठी प्रयत्न करत आहे.
Mar 14, 2012, 04:12 PM ISTनाशिकमध्ये माझाच महापौर - राज ठाकरे
नाशिकमध्ये मनसेचाच महापौर असेल, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत केला. ते मनसेच्या ६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजीत मेळाव्यात मनसैनिकांना मार्गदर्शन करत होते.
Mar 9, 2012, 10:04 PM ISTमनसेला पाठिंबा देण्याचे भाजपचे संकेत
नाशिकमध्ये जनादेशाचा आदर केला जाईल असं सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी मनसेला पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. त्यातच शिवसेनेनं महापौरपदासाठी दावा केला आहे. त्यासाठी अपक्षांची जुळवाजुळव सुरू आहे. बहुमतासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेणार अशीची चर्चा आहे.
Mar 9, 2012, 07:48 PM ISTमनसेचे महापौरासाठी २ उमेदवार!
मनसे महापौरपदासाठी दोन उमेदवार उभे करणार आहे. दगाफटका टाळण्यासाठी मनसेतर्फे शशिकांत जाधव आणि यतीन वाघ महापौरपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. तर उपमहापौरपदासाठी रमेश धोंबडे आणि अशोक मुर्तडक अर्ज दाखल करणार आहेत
Mar 9, 2012, 05:44 PM ISTनाशिक महापौरपदाचा गुंता वाढला
नाशिकमध्ये महापौरपदाचा तिढा वाढलाय. शिवसेनेनं महापौरपदासाठी हालचाली सुरू केल्यात. त्यासाठी अपक्षांची जुळवाजुळव सुरू आहे. बहुमतासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेणार अशी चर्चा आहे. तर भाजप मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय.
Mar 9, 2012, 05:44 PM ISTकाय बोलणार राज? याकडे लक्ष...
मनसेचा आज सहावा वर्धापनदिन आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईत षण्मुखानंद सभागृहात सभा घेणार आहेत. महापालिकांच्या सत्तासमिकरणाबाबत राज ठाकरे काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.
Mar 9, 2012, 04:49 PM ISTमनसेचा ६ वा वर्धापनदिन, आज ‘राज’गर्जना!
मनसेचा आज सहावा वर्धापनदिन आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईत षण्मुखानंद सभागृहात सभा घेणार आहेत. महापालिकांच्या सत्ता समीकरणाबाबत राज ठाकरे काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.
Mar 9, 2012, 04:27 PM ISTऔरंगाबादमध्ये आता 'ठाकरे' पॅटर्न
ठाणे पालिकेत शिवसेनेला बहुमत नसताना विकासाच्या मुद्यावर आणि लोकभावनेचा आदर करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला. आता औरंगाबादमध्येही असाच पॅटर्न राबवून जिल्हा परिषदेवर शिवसेना-भाजप युतीचा झेंडा फडकवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्या दृष्टीने एक पाऊल शिवसेनेने पुढे टाकले आहे. आता मनसे काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.
Mar 7, 2012, 04:21 PM ISTपुणे पालिका विरोधी पक्षनेतेपद मनसेला
पुणे महापालिकेत महायुतीतले तीनही पक्ष स्वतंत्र पक्ष म्हणून नोंदणी करणार आहेत. भाजप नेते विनोद तावडे यांनी पुण्यात ही माहिती दिली. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद मनसेला मिळणार आहे.
Mar 2, 2012, 08:38 AM ISTराज'मार्ग' अवघडच....
मुंबई महापालिका निवडणूकीत किंग बनण्याचं स्वप्न मनी बाळगेल्या राज ठाकरेंची निकालानंतर निराशाच झाली. मुंबईतल्या असमाधानकारक कामगिरीसाठी काही प्रमाणात स्वतः राज ठाकरे यांना तर ब-याच प्रमाणात पक्षसंघटनेला जबाबदार मानलं जातंय. मुंबई महापालिका निवडणूकीचे निकाल पाहाता 2014 साली होणा-या विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीनं मनसेला कामगिरी सुधारण्यासाठी बराच वेळ हाती आहे.
Feb 29, 2012, 04:31 PM ISTमुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मनसेच्या दक्षिण मुंबईतल्या सहा विभागअध्यक्षांनी राजीनामे दिलेत. महापालिका निवडणुकीत संबंधित विभागात झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत या सहा जणांनी राजीनामे दिले आहेत.
Feb 29, 2012, 03:52 PM ISTपालिकेत हाणामारी, मनसे नगरसेवकांवर गुन्हा
यवतमाळ जिल्ह्यातील वणी नगरपरिषदेत मनसे आणि अपक्ष नगरसेवकांत हाणामारी झाली असून नगरसेवकांनी खुर्च्याची फेकाफेक केल्याने दोन नगरसेविका जखमी झाल्या आहेत.
Feb 28, 2012, 07:24 PM ISTमनसेचे नगरसेवक अज्ञातस्थळी
नाशिकमधील मनसेचे सर्व ४० नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. फोडाफोडीच्या राजकाणात मनसेची खबरदारी घेतली आहे. त्यामुळे महापौरपदाची चुरस शिगेला पोहचली आहे.
Feb 23, 2012, 10:43 PM ISTमनसेचा पुण्यात विरोधकाचा दावा
पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदावर मनसेनं दावा सांगितला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप-आरपीआय गोटात हालचाली सुरू झाल्या आहेत. महायुतीला मनसे दे धक्का देणार का, याची उत्सुकता आहे.
Feb 23, 2012, 11:05 AM IST