मनसे

राज ठाकरेंच्या मनसेत गद्दारीची कीड!

पक्षात आजही गटबाजी सुरू आहे. ही गटबाजी संपत नसल्याने पक्षाला फटका बसत असल्याचे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचे कान चांगलेच उपटले. निमित्त होते ते, पदाधिकारी, आमदार, नगरसेवक यांच्या बैठकीचे.

May 16, 2012, 06:46 PM IST

अंबरनाथमध्ये मनसे पॅटर्न संपुष्टात

अंबरनाथमध्ये आज मनसे पॅटर्न संपुष्टात आलाय. सेनेला कामाच्या मुद्यावर पाठींबा देणाऱ्या मनसेच्या ६ नगर सेवकांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीला सभापती निवडणुकीत पाठिबा दिला. त्यामुळे आत्ता आघाडीचे २६ तर युतीचे आणि अपक्ष मिळून २४ नगरसेवक असे पक्षीय बलाबल आहे.

May 16, 2012, 04:59 PM IST

भगवती हॉस्पिटलला 'मनसे'चा इशारा

मुंबई उपनगरातील बोरिवलीतल्या महानगरपालिकेच्या भगवती हॉस्पिटलवर मनसेनं मोर्चा नेऊन वैद्यकिय अधिका-यांना घेराव घालून मनसे स्टाईलनं निवेदन दिलं. इथल्या सर्जिकल विभागात एकही डॉक्टर नसल्यामुळं गेल्या दोन महिन्यांत हॉस्पीटलमध्ये एकही ऑपरेशन झालेलं नाही.

May 9, 2012, 12:00 AM IST

राज ठाकरे फितुरांवर कारवाई करणार!

मुंबई महापालिकेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्याची शक्यता असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला केवळ २८ जागांवर यश मिळविता आले. यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच नाराज असून त्यांनी वेळोवेळी दगा-फटका करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करणार असल्याचे संकेत दिले होते.

Apr 22, 2012, 08:24 AM IST

राज ठाकरेंची याचिका हायकोर्टाने फेटाळली

शिवाजी पार्कवर फूट फेस्टिव्हल आयोजित करण्यास परवानगी मिळावी या मागणीची मनसेची याचिका मुंबई हायकोर्टाने आज फेटाळली.

Apr 19, 2012, 04:49 PM IST

"नीतीश मनसेपुढे का झुकले?"- लालू

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अटींपुढे नितीशकुमारांनी झुकून मुंबईमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बिहारी अस्मितेला कलंक लावला असल्याचा आरोप राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी केला आहे.

Apr 16, 2012, 10:17 PM IST

बिहार दिवसावर वाद हा 'बिनपैशाचा तमाशा'!

बिहार दिनावरुन मनसे आणि नितीश कुमार यांच्यात अखेर समेट झाली. पण, यावर शिवसेनेने आपल्या खास शैलीत टीका केली आहे. बिहार दिनावर आधी वाद आणि नंतर समेट हे तर फिक्सिंग होते, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

Apr 13, 2012, 09:14 PM IST

बिहार दिन : राज ठाकरेंच्या कृष्णकुंजवर बैठक

मुंबईत बिहार दिन साजरा केला जाईल. आम्हाला कोणीही अडवून शकत नाही, असे विधान बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी केले होते. त्यानंतर मालेगावात तुम्ही मुंबईत बिहार दिन साजरा करून दाखवाच, असा इशारा ठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. आज मुंबईत 15 एप्रिल रोजी मुंबईत साजरा करण्यात येणाऱ्या बिहारदिनाबाबत भूमिका ठरविण्यासाठी कृष्णकुंजवर मनसे आमदारांची तातडीची बैठक बोलाविली.

Apr 13, 2012, 01:00 PM IST

बिहार दिन साजरा करून दाखवाच - राज

बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी मुंबईत येऊन बिहार दिस साजरा करून दाखवाच, असे प्रति आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहे. प्रत्येकांने आपल्या राज्याचा दिन त्याच राज्यात साजरा केला पाहिजे. महाराष्ट्र काय धर्मशाळा आहे का?

Apr 12, 2012, 09:43 PM IST

राज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

राज ठाकरे यांची मुलूख मैदान तोफ मालेगावात धडाडली. या भाषणात त्यांनी नीतिश कुमार, अबु आझमी यांच्यासह शिवसेनेवर जोरदार हल्ला चढविला.

Apr 12, 2012, 09:00 PM IST

बिहार दिन तुमच्या राज्यात करा - उद्धव

मुंबईत बिहार दिन साजरा करण्यावरून राज्यातले राजकारण चांगलेच तापले आहे. बिहार दिन महाराष्ट्रात साजरा केला तर महाराष्ट्र दिनही बिहारमध्ये साजरा करावा, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केला आहे.

Apr 12, 2012, 05:31 PM IST

राज यांची आज मालेगावात प्रचारसभा

नाशिकची महापालिका काबीज केल्यानंतर मनसेनं आता मालेगावची महापालिकाही ताब्यात घेण्याचा चंग बांधलाय. यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकचे सर्व पदाधिकारी मालेगावात तळ ठोकून आहेत.

Apr 12, 2012, 01:27 PM IST

मुंबईत होणार 'बिहार दिन' - नीतिशकुमार

१५ एप्रिल रोजी येथे आयोजित करण्यात आलेल्या 'बिहार दिन' कार्यक्रमाला आपल्याला कोणीही अडवू शकत नाही, असे दंड आता नव्याने मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी थोपटले आहेत. त्यामुळे ज्याला काही सन साजरे किंवा दिन साजरे करायचे आहेत, ते त्यांनी आपल्या राज्यात साजरे करावेत, महाराष्ट्रात येऊन त्याचे राजकारण करू नये, गाठ माझ्याशी आहे, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याआधी दिले होते. त्यामुळे कडवा विरोध दर्शविणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नीतिशकुमार यांनी खुले आव्हान दिल्याचे म्हटले जात आहे.

Apr 10, 2012, 09:05 AM IST

हर्षवर्धन अखेर 'मनसेत'च राहाणार

औरंगाबादमधील कन्नडचे मनसे आमदार हर्षवर्धन जाधव मनसेत राहणार की शिवसेनेत जाणार या वादावर सध्यातरी पडदा पडला आहे. आपण मनसेतच राहणार असल्याचं खुद्द हर्षवर्धन जाधव यांनी सांगितलंय.

Apr 3, 2012, 10:07 AM IST

हर्षवर्धन जाधव मनसेला जय महाराष्ट्र करणार?

हर्षवर्धन पाटील मनसेला जय महाराष्ट्र करण्याची शक्यता आहे. जाधव आज संध्याकाळी पत्रकार परिषदेत यासंदर्भात घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हर्षवर्धन जाधव मनसेच्या तिकिटावर औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघातून निवडून आले आहेत.

Apr 2, 2012, 02:17 PM IST