मनसे

मोर्चा काढणारच; मनसे व्यूहरचनेत दंग

गृहमंत्री आर. आर. पाटील आणि मुंबईचे पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मनसे मंगळवारी म्हणजेच उद्या मोर्चा काढणार आहे. या मोर्चासाठी मनसे विशेष व्युहरचना करण्यात व्यस्त आहे.

Aug 20, 2012, 12:46 PM IST

अजित पवारांनाच करा गृहमंत्री- बाळा नांदगावकर

अजित पवारच बॉम्बस्फोटाचे खरे सूत्रधार शोधून काढतील. त्यांनाच गृहखाते द्यावे. आर. आर. पाटील यांच्याकडील गृहखाते काढून घ्या. अजित पवारांकडेच हिंमत आहे अशी उपरोधिक टीका मनसेचे नेते आमदार बाळा नांदगावकर यांनी केली.

Aug 10, 2012, 08:45 PM IST

कोल्हापुरात मनसेचा मोर्चा

जागतिक वारसा स्थळात समावेश असणा-या कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात उत्खनन होतंय. हे उत्खनन त्वरित थांबवावं या मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

Aug 9, 2012, 07:28 AM IST

दांडीबहाद्दर आमदारांत काँग्रेसची बाजी

मराठवाड्यातील आमदार विधीमंडळात सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याऐवजी दांडी मारण्यातच पटाईत असल्याचं महाराष्ट्र विधानसभेच्या अहवालातच समोर आलंय. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठवाड्यातील विधानसभेच्या ५१ आमदारांपैकी ५० टक्के आमदारांनी कामकाजाला दांडी मारली. या दांडीबहाद्दर आमदारांमध्ये पहिला नंबर पटकावलाय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी

Jul 28, 2012, 12:46 PM IST

राजना दिल्लीतून फोन आला असता तर...

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना तटस्थ राहणार असल्याची भूमिका मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलीय. दिल्लीतून कोणत्याही ज्येष्ट नेत्यानं संपर्क न साधल्यानं मनसेनं हा निर्णय घेतलाय.

Jul 19, 2012, 12:17 PM IST

बनावट औषधांचा खेळ, मनसेचा राडा

कुठलाही आजार बरा करून देतो, असं सांगून लोकांना लाखो रुपयांचा गंडा घालणा-या औषध एजन्सीचा नागपुरात पर्दाफाश झालाय. एवढंच नाहीतर या बनावट औषधांमुळं काहींवर किडनी खराब होण्याची वेळ आली आहे.

Jul 18, 2012, 09:39 PM IST

राज ठाकरे देणार का काँग्रेसला पाठिंबा?

राष्ट्रपतीपदाची निवडणूक उद्या होतेय आणि या निवडणुकीत काँग्रेसनं मनसेकडेही पाठिंबा मागितला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि काँग्रेसला पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय.

Jul 18, 2012, 05:40 PM IST

मनसे उमेदवारांना चिंता, मराठी मतदारांची वानवा

मीरा भाईंदर महापालिकेत सर्वच पक्षांमध्ये तिकिट वाटपावरून रणसंग्राम सुरू असतानाच मनसेनं इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. 95 जागांसाठी 140 उमेदवारांनी परीक्षा दिली आहे.

Jul 15, 2012, 05:48 PM IST

कानडी दडपशाहीचा एकमुखी निषेध

बेळगाव महापालिका बरखास्तीचे विधानसभेत जोरदार पडसाद उमटले. वादग्रस्त सीमाभागाबाबत सुप्रीम कोर्टात निकाल लागेपर्यंत हा भाग केंद्रशासित म्हणून जाहीर करावा, या आशयाचा मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. पण, मनसे गटनेत्यांनी मात्र, या मुद्द्याचा निकाल लागेपर्यंत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करु नये, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांना केलीय.

Jul 13, 2012, 09:47 AM IST

राज आदेशानंतर ठाण्यातही खळ्ळखट्याक

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या टोलविरोधातल्या आदेशाचे पडसाद ठाण्यातही उमटले. ठाण्यात घोडबंदर नाक्यावर मनसैनिकांनी आंदोलन करत, टोलनाका बंद केला.. तर आनंदनगर टोलनाक्याच्या मॅनेजरला मनसैनिकांनी घेराव घातला होता.

Jun 14, 2012, 10:33 AM IST

मनसेचा टोल हल्ला, भुजबळांवर गुन्हा

पुण्यातल्या शिरूरजवळच्या टोलनाक्यावरील टोल वसुलीविरोधात कोर्टात दाखल झालेल्या प्रकरणी कोर्टाच्या आदेशावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यासह २२ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यांनतर राज्यभर मनसेच्या रडारावर टोल नाके आलेत. ठिकठिकाणी टोल नाक्यांची तोडफोड करण्यात आली आहे.

Jun 13, 2012, 05:48 PM IST

राज ठाकरेंचं आता टोलनाक्यांविरोधात आंदोलन

राज ठाकरेंनी राज्यातल्या टोल नाक्यांविरोधात आंदोलन सुरु करण्याची घोषणा केलीय. मुंबईत प्लॉस्टिकमुक्ती राबवण्यापेक्षा टोलमुक्ती अभियान राबवा असं आवाहन त्यांनी सरकारला केलंय.

Jun 12, 2012, 02:45 PM IST

मनसे आमदारांच्या कार्यालयावर हल्ला

मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या कार्यालयावर दगडफेक तीन बाईकवर आलेल्या सहा जणांकडून दगडफेक करण्यात आली. मात्र, ही का दगडफेक केली याचे कारण समजू शकलेले नाही. आमदार दरेकरांचे दहिसर येथे ऑफिसवर आहे. दरेकरांच्या ऑफिसबाहेरील सीसीटीव्ही फोडले.

Jun 10, 2012, 11:13 PM IST

शिवसेना-भुजबळ सामन्यात मनसेची भूमिका काय?

नाशिकच्या स्थानिक स्वराज संस्थेच्या एका जागेसाठी निवडणूक होतेय. यावेळी नाशिकमध्ये भाजप शिवसेना आणि मनसे अशी युती होण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीला काँग्रेस साथ देणार आहे. असं असलं तरी सामना शिवसेना विरुद्ध छगन भुजबळ असाच होणार असल्याच सांगण्यात येतंय.

May 24, 2012, 08:40 AM IST

सेनेच्या बेगडी मराठीप्रेमाचा पर्दाफाश!

एरव्ही मराठीचा घोषा लावणारी शिवसेनेचं मराठीप्रेम कीती बेगडी आहे, याचा नमुनाच औरंगाबादेत पहावयास मिळतोय. गेल्या 15 वर्षांपासून औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे, मात्र औरंगाबादेत सगळीकडेच दुकानावर इंग्रजी पाट्या दिसतात.

May 17, 2012, 09:58 PM IST