मनसे

अरे बापरे, मनसेचे 37 नगरसेवक अज्ञातस्थळी

नाशिक मनपाची महापौर पदासाठी 12 सप्टेंबरला  निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव पत्कराव्या लागलेल्या मनसेला आता आपले नगरसेवक सांभाळण्याची वेळ आलीय. मनसेला नगरसेवकांच्या पळवापळवीची भिती सतावत आहे. त्यामुळे मनसेचे 37 नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झालेत.

Sep 4, 2014, 09:10 AM IST

मनसेची बहुचर्चित 'ब्लू प्रिंट' अखेर जाहीर होणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बहुचर्चित ब्लू प्रिंटसाठी पुन्हा एकदा नवीन मुहूर्त जाहीर केला आहे. 

Sep 3, 2014, 01:05 PM IST

राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे मनसे 'कनफ्यूज'

राज ठाकरे स्वत: विधानसभा निवडणूक लढवणार की नाही, अजूनही निश्चित नाही.... निवडणुकीबाबतच्या त्यांच्या विधानाचा विपर्यास केल्याचा खुलासा राज यांनी केलाय.... त्यामुळ कनफ्युजनमध्ये आणखी भरच पडलीय.

Aug 26, 2014, 11:54 AM IST

माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला – राज ठाकरे

राज ठाकरे स्वत: विधानसभा निवडणूक लढवणार की नाही हे अद्याप निश्चित नाही... निवडणूकीबाबतच्या आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा खुलासा राज यांनी केलाय. त्यामुळं राज स्वत: विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी रिंगणात उतरणार की नाही हे अद्याप निश्चित झालेलं नाही.

Aug 25, 2014, 12:17 PM IST

वेगळ्या विदर्भाला माझा विरोध - राज ठाकरे

वेगळ्या विदर्भाला माझा विरोध आहे, विदर्भाचा विकास ज्यांनी केला नाही, त्याचा राज्याला त्रास का, यासाठी राज्याचे तुकडे पाडणे हा उपाय असू शकत नाही, ज्यांनी विकास केला नाही, त्याची शिक्षा संपूर्ण महाराष्ट्राला कशी देणार, असं राज यांनी म्हटलंय.

Aug 24, 2014, 07:24 PM IST

राज ठाकरे न बोलता निघून गेलेत

शिवसेना आणि मनसे यांच्यातल्या सध्याच्या वादाचं कारण ठरलेल्या भांडूपच्या थीम पार्कचं राज ठाकरे यांच्या हस्ते भूमीपूजन झालं. मात्र भूमीपूजनानंतर कोणत्याही विषयावर न बोलता राज ठाकरे निघून गेले.

Aug 23, 2014, 08:20 PM IST

मनसेच्या 'थीम पार्क'ला शिवसेनेचं ग्रहण?

मनसेच्या अम्युझमेंट पार्कला शिवसेनेचं ग्रहण लागण्याची शक्यता निर्माण झालीये. ज्या जागेवर हे पार्क उभं रहाणार आहे ती जागा मीठागराची असल्याची तक्रार शिवसेनेनं केलीये. त्यासाठी लागणारी कुठलीही परवानगी उपाधिक्षक कार्यालयातून घेतली नाही असा आरोप शिवसेनेनं केलाय.

Aug 23, 2014, 12:06 PM IST

मनसे नगरसेविकेला 15 हजारांची लाच घेताना अटक

माहीममधील मनसेची नगरसेविका श्रद्धा पाटील आणि तिचे पती राजेश पाटील यांना 15 हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली.

Aug 22, 2014, 06:25 PM IST

मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांचे फंडे!

विधानसभा निवडणुका जवळ येवू लागल्यानं सर्वच पक्षांचे उमेदवार आता तयारीला लागलेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून वेगवेगळे फंडेही वापरले जात आहेत. वरळीतही राष्ट्रवादी आणि मनसेनं मतदारांना जवळ करण्यासाठी असेच काही फंडे वापरलेत.  

Aug 17, 2014, 08:32 PM IST

‘ब्लू प्रिंट’ ऑगस्टमध्येच सादर करु - राज ठाकरे

सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये मनसेच्या ब्लू प्रिंटविषयी बातम्या येत आहेत. मात्र त्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ब्लू प्रिंट कधी येणार हे मी वेळ आल्यावर सांगेन अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय. हल्ली प्रसारमाध्यमे वॉट्स अॅणपवरुन बातम्या करतात अशी टीकाही राज ठाकरेंनी केली आहे.

Aug 17, 2014, 06:12 PM IST