अरे बापरे, मनसेचे 37 नगरसेवक अज्ञातस्थळी

नाशिक मनपाची महापौर पदासाठी 12 सप्टेंबरला  निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव पत्कराव्या लागलेल्या मनसेला आता आपले नगरसेवक सांभाळण्याची वेळ आलीय. मनसेला नगरसेवकांच्या पळवापळवीची भिती सतावत आहे. त्यामुळे मनसेचे 37 नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झालेत.

Updated: Sep 4, 2014, 09:11 AM IST
अरे बापरे, मनसेचे 37 नगरसेवक अज्ञातस्थळी title=

नाशिक : नाशिक मनपाची महापौर पदासाठी 12 सप्टेंबरला  निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव पत्कराव्या लागलेल्या मनसेला आता आपले नगरसेवक सांभाळण्याची वेळ आलीय. मनसेला नगरसेवकांच्या पळवापळवीची भिती सतावत आहे. त्यामुळे मनसेचे 37 नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झालेत.

राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना नाशिकमध्ये मात्र महापौरपदाच्या निवडणुकांवरुन राजकीय नाट्य रंगलंय. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी मनसेच्या गोटात अविश्वासाचं वातावरण असल्याचं समोर आलंय.

एक दोन दिवसांत निवडणुकांची तारीख जाहीर होणार असल्यानं इच्छुकांनी साम दामदंडभेद रणनीती आखण्यास सुरुवात केलीय. मनसेचे दोन नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागलायची चर्चा सुरु झालीय. त्यातूनच दगाफटका टाळण्यासाठी महापौरपदाचं निवडणुकीआधी सर्व नगरसेवकांना सहलीला पाठवण्यात आलंय. तर दुसरीकडे मनसेचे नगरसेवक पळवल्याच्या वृताचं शिवसेनेनं खंडन केलंय.

तिकडे भाजपनेही राज ठाकरेंची भेट घेऊन महापौरपदावर दावा केलाय. लोकसभेतील पराभवनंतर मनसे पुरती खचलीय. त्यातच पालिकेत सत्ता असूनसुद्धा काम होत नसल्यानं नगरसेवकांमध्ये नाराजी आहे. पक्षात राहून नागरिकांची नाराजी ओढून घेण्यापेक्षा दुसरा घरोबा केला तर हरकत काय या विचारापर्यंत काही नगरसवेक आले असून नव्या पर्यायाच्या शोधात आहेत.. त्यामुळं आगामी काळात नाशिकमध्ये राजकीय स्फोट होण्याची शक्यता आहे.