मुंबई: मनसेच्या अम्युझमेंट पार्कला शिवसेनेचं ग्रहण लागण्याची शक्यता निर्माण झालीये. ज्या जागेवर हे पार्क उभं रहाणार आहे ती जागा मीठागराची असल्याची तक्रार शिवसेनेनं केलीये. त्यासाठी लागणारी कुठलीही परवानगी उपाधिक्षक कार्यालयातून घेतली नाही असा आरोप शिवसेनेनं केलाय.
शिवसेनेनं याबाबत कांजूर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केलीये. मंगेश सांगळे यांनी केवळ भांडुपेश्वर कुंडाच्या शुशोभिकरणासाठी परवानगी घेतली असून मतांचं राजकारण करण्यासाठी हे अनाधिकृत थीम पार्क बनवण्याचा घाट घातल्याची टीका शिवसेनेनं केलीये.
आपल्या मतदारसंघातील असुविधा आधी दूर कराव्यात आणि नंतर पार्क बनवण्याचा विचार करावा अशी टीका माजी महापौर दत्ता दळवी यांनी केलीये.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.