पाऊस

कोल्हापुरात पावसाची उसंत, पूरस्थिती जैसे थे

पावसाने उसंत घेतली असली तरी पूरस्थिती जैसे थे आहे. पंचगंगा नदी अजूनही इशारा पातळीवरुन वाहत असून जिल्ह्यातील अनेक मार्ग सलग चौथ्या दिवशाही बंद आहेत. त्यामुळे पाण्यातून वाट काढत लोकांना जावं लागते. 

Jul 22, 2017, 06:49 PM IST

पावसामुळे गोठा कोसळून तीन म्हशींचा मृत्यू , महिला जखमी

कर्जत तालुक्यातील शिरसे गाव इथं गुरांचा गोठा कोसळून तीन म्हशींचा मृत्यू झालाय तर एक महिला जखमी झालीय. मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडलीय. 

Jul 22, 2017, 04:23 PM IST

लोणावळ्यात जोरदार पाऊस, एक्सप्रेस हायवेवरची वाहतूकही मंदावली

लोणावळा शहर आणि ग्रामीण परिसरात अतिवृष्टी झालीये. मागील २४ तासांपासून या भागात मुसळधार पाऊस सुरु आहे.

Jul 22, 2017, 12:10 PM IST

पंचगंगेची धोका पातळीकडे वाटचाल, जांभळीतील संपर्क तुटला

जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून पंचगंगा नदीची राजाराम बंधारा पातळी ४१ फूट २ इंच इतकी झालीय.

Jul 22, 2017, 08:55 AM IST

पुरात अडकलीत दोन माकडं, पाच दिवस झाडावर अडकून

कोल्हापूर जिल्ह्यात पुराच्या पाण्यात पाच दिवसांपासून झाडावर अडकून पडलेल्या माकडांना अन्न पुरवण्यात आले आहे. त्यामुळे या माकडांचा जीव वाचलाय.

Jul 21, 2017, 11:05 PM IST

पूरपरिस्थितीमुळे कोल्हापूर - रत्नागिरी वाहतूक बंद

जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून जांभळी आणि कासारी नदीला देखील पूर आलाय. इतकंच नव्हे तर या पुराचं पाणी बाजारभोगाव इथल्या  बाजारपेठेत शिरले आहे. दरम्यान, कोल्हापूर - रत्नागिरी मार्ग पूर्णत: वहातुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. शिवाजी पुलावरील वहातूक प्रशासनान थांबवली आहे.

Jul 21, 2017, 10:32 PM IST

सांगलीत वारणा धरणाच्या परिसरात अतिवृष्टी

 सांगली  जिल्ह्यात पावसाचा जोर  कायम  असून  वारणा धरणाच्या परिसरात अतिवृष्टी  झाली आहे.  

Jul 21, 2017, 12:21 PM IST