कोल्हापूर : पावसाने उसंत घेतली असली तरी पूरस्थिती जैसे थे आहे. पंचगंगा नदी अजूनही इशारा पातळीवरुन वाहत असून जिल्ह्यातील अनेक मार्ग सलग चौथ्या दिवशाही बंद आहेत. त्यामुळे पाण्यातून वाट काढत लोकांना जावं लागते.
पंचगंगा नदीसह कुंभी, कासारी, भोगावती या नद्या दुथडी भरुन वाहतायत. या सगळ्याच नद्याचं पाणी पात्राबाहेर पडल्यामुळं गंभीर पूरस्थिती निर्माण झालीय. जिल्ह्यातील तब्बल ७३ बंधारे पाण्याखाली असून अनेक गावांचा संपर्क तुटलाय. पंचगंगेची आताची पाणी पातळी ही ४१ फूट १० इंच इतकी आहे.
पंचगंगेची धोका पातळी ४३ फुट इतकी असल्यामुळं प्रशासनं सतर्क झालं असून नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्क रहाण्याचे आदेश दिलेत. जिल्ह्यातील ४३ रस्त्यावर पाणी आल्यानं या ठिकाणची वाहतूक खोळंबली. सलग पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.