देवेंद्र फडणवीस

मनसेला खिंडार! गिते, दरेकर भाजपमध्ये!

विधानसभा निव़डणुकीत सपाटून मार खाल्लेला मनसेला मोठं खिंडार पडलंय. वसंत गीते, प्रवीण दरेकर आणि रमेश पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उद्या मुंबईत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. 

Jan 12, 2015, 04:01 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र यांचा भ्रष्टाचारी बाबूंना दणका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचारी बाबूंबद्दल एक धाडसी निर्णय घेतला आहे. ज्या बड्या बाबूंवर भ्रष्टाचाराचे आरोप होते, मात्र त्यांची मालमत्ता जप्त करण्याच्या आदेशाची लाललुचपत प्रतिबंधक विभागाकडून वाट पाहिली जात होती, या जप्तीला देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे भ्रष्टाचारी बाबूंची मालमत्ता आता जप्त होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे काही सरकारी बाबूंना आता हुडहुडी भरली आहे.

Jan 9, 2015, 10:52 AM IST

सरकारमध्ये 'गृह'कलह, खडसेंनी लिहिलं पत्र!

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुन मंत्र्यांमध्ये नाराजी उमटलीय. नुकत्याच ४२ IAS अधिकाऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांनी बदल्या केल्या. मात्र बदल्या करताना मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतलं नाही म्हणून, मंत्र्यांमध्ये नाराजी पसरलीय. 

Jan 6, 2015, 12:16 PM IST

आरक्षण: धनगर विरुद्ध आदिवासी संघर्ष उफाळणार?

धनगर समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र याला आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी स्पष्टपणे विरोध केलाय. या मुद्यावरून आता आदिवासी नेते आणि मंत्री आक्रमक झालेत. त्यामुळं यावरून धनगर विरुद्ध आदिवासी असा संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची शक्यताय.

Jan 5, 2015, 09:26 PM IST

'धनगर समाजाला दिलेल्या शब्दापासून मागे हटणार नाही'

महायुतीने धनगर समाजाला जो शब्द दिला आहे, त्या शब्दापासून महायुती मागे हटणार नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये केलं आहे, या शिवाय आदिवासी समाजाच्या आरक्षणातला वाटा, आम्ही कोणालाही देणार नसल्याचंही  मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

Jan 4, 2015, 05:59 PM IST

आरारंsss चव्हाण, पवारांच्या सुरक्षेला कात्री!

देवेंद्र फडणवीस सरकारनं राज्यातल्या काही वजनदार राजकीय नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय.

Jan 1, 2015, 10:40 PM IST

मुख्यमंत्र्यांचा सीएसटी ते कल्याण लोकल प्रवास

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याण असा प्रवास लोकलने केला. कुलाब्यातील कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांना कल्याणला जायचे होते, कल्याणला रस्त्याने वेळेवर पोहोचणे शक्य नव्हते, म्हणून त्यांनी लोकलचा पर्याय वापरला.

Dec 29, 2014, 09:34 PM IST

ऊसाच्या दरासाठी १७ दिवसांचं आंदोलन मागे

ऊसाच्या दरासाठी १७ दिवसांचं आंदोलन मागे

Dec 27, 2014, 09:38 AM IST