मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचारी बाबूंबद्दल एक धाडसी निर्णय घेतला आहे. ज्या बड्या बाबूंवर भ्रष्टाचाराचे आरोप होते, मात्र त्यांची मालमत्ता जप्त करण्याच्या आदेशाची लाललुचपत प्रतिबंधक विभागाकडून वाट पाहिली जात होती, या जप्तीला देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे भ्रष्टाचारी बाबूंची मालमत्ता आता जप्त होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे काही सरकारी बाबूंना आता हुडहुडी भरली आहे.
भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आठ बड्या अधिकाऱ्यांची संपत्ती जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मात्र भ्रष्टाचाराचे आरोप असलेली मोठी यादी अजून निघू शकते, या सर्वांच्या संपत्तीच्या जप्तीचे आदेश मुख्यमंत्री कधी देतील याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
या अधिकाऱ्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश
नितीश ठाकूर, उप जिल्हाधिकारी, रायगड, संपत्ती - १४ लाख ३३८ रुपये
भाऊसाहेब आंधळकर, पोलिस निरीक्षक, पुणे ग्रामीण, संपत्ती - ९८ लाख
पंढरी कावळे, मुख्याध्यापक, गडचिरोली, संपत्ती - ७१ लाख
विनोद निखाते, क्लर्क, चंद्रपूर, संपत्ती - १२ लाख
दादाजी खैरनार, उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, दिंडोरी, संपत्ती - २३ लाख
अशोक मान, वरिष्ठ सहाय्यक, ससून रुग्णालय, पुणे, संपत्ती - २१ लाख
विजयकुमार बिराजदार, प्रभाग अभियंता, जलसंपदा विभाग, लातूर, संपत्ती - ३८ लाख
नितीश पोद्दार, कंपाऊंडर, प्राथमिक आरोग्य केंद्र, गडचिरोली, संपत्ती ६ लाख
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.