दिलीप पाडगावकर

अभिनेते दिलीप प्रभावळकर सुखरूप

टाइम्स ऑफ इंडियाचे माजी संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांचे काल पुण्यात निधन झाले. याच्या बातम्याही आज वर्तमानपत्रात आणि टीव्ही चॅनलमध्ये प्रसिद्ध झाल्या.  पण या बातमीनंतर सोशल मीडियावर काही खोडसाळ प्राण्यांनी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर बाबत वाईट बातमीच्या पोस्ट धडाधड टाकल्या.  पण ही बातमी खोटी आहे, याची पुष्टी 24taas.com करत आहे. 

Nov 26, 2016, 10:16 PM IST

दिलीप पाडगावकर यांचे आज पुण्यात निधन

ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांचे आज पुण्यात निधन झाले. गेला आठवडाभर त्याच्यावर पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. ते किडनीच्या आजाराने आजारी होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 72 वर्षांचे होते. 

Nov 25, 2016, 12:56 PM IST