पुणे : ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांचे आज पुण्यात निधन झाले. गेला आठवडाभर त्याच्यावर पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. ते किडनीच्या आजाराने आजारी होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 72 वर्षांचे होते.
पाडगावकर हे टाइम्स ऑफ इंडियाचे अनेक वर्ष संपादक होते. निवृत्तीनंतरही त्यांच्या लिखाणाचा ध्यास सोडला नव्हाता. अगदी आता आतापर्यंत तेविविध विषयांवर लिखाण करत होते. आंतरराष्ट्रीय संबंधांचे विशेषतः अमेरिका आणि युरोपच्या राजकारणाचा, समाजकारणाचा त्यांचा गाढा अभ्यास होता.
काश्मीर प्रश्नावर युपीएच्या काळात नेमण्यात आलेल्या मध्यस्थांच्या समितीतमध्ये पाडगावकरांचा समावेश होता. 2010मध्ये काश्मीरमध्ये उफाळून आलेल्या दगडफेकीच्या सत्रानंतर तिथलं वातावरण शांत करण्यात पाडगावकरांच्या मध्यस्थी गटाची मोठी भूमिका होती.
राजकारण आणि समाजकारणाशिवाय कलेच्या क्षेत्रातही त्यांची मुशाफिरी होती. त्यांच्या जाण्यानं भारतीय पत्रकारितेच्या क्षेत्राचं कधीही भरून न निघाणारं नुकसान झालयं.