BHC Clerk Recruitment 2025: जर तुम्ही चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख,पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
मुंबई उच्च न्यायालयात लिपिकची एकूण 129 पदे भरली जाणार आहेत. सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 23 जानेवारी 2025 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट bhc.gov.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
मुंबई उच्च न्यायालयातील लिपिक भरतीची निवड प्रक्रिया 3 टप्प्यात केली जाणार आहे. ज्यामध्ये लेखी परीक्षा, टायपिंग टेस्ट आणि वायवा यांचा समावेश आहे. लेखी परीक्षेत सामान्य ज्ञान, तार्किक क्षमता इत्यादी विषयांवर प्रश्न विचारले जातील. टायपिंग चाचणी कॉम्प्यूटरवर घेतली जाणार असून यात तुमचा इंग्रजी टायपिंगचा स्पीड आणि अचूकता तपासली जाईल. यानंतर उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.
किती भरावे लागेल अर्ज शुल्क?
मुंबई हायकोर्ट भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांकडून 100 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल. एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांनादेखील 100 रुपये शुल्क भरावे लागेल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी टायपिंग टेस्ट आणि मुलाखतीचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल. परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करुन दिले जाईल. इंग्रजी टायपिंगची परीक्षा फक्त कॉम्प्युटरवर घेतली जाईल, याची नोंद घ्या. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आलाय.
सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट bhc.gov.in वर जा. त्यानंतर उमेदवारांनी होमपेजवर दिलेल्या 'ऑनलाइन अर्ज करा' लिंकवर क्लिक करावे. आता तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि इतर आवश्यक तपशील भरून नोंदणी करा. नोंदणी केल्यानंतर लॉगिन करा आणि अर्ज भरा. सर्व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या नमुन्यात अपलोड करा. तुम्हाला अर्ज शुल्क ऑनलाइन भरत येणार आहे.अर्जाचा फॉर्म सबमिट करा आणि त्याची एक प्रत तुमच्याकडे ठेवा. 5 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्या.