कर्नाटक

उत्तर प्रदेश, कर्नाटक, आसाम राज्यपालांचे राजीनामे

उत्तर प्रदेशचे राज्यपाल बी. एल जोशी यांनी आज आपला राजीनामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे सोपवला आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल यांच्या राजीनाम्या पाठोपाठ आता कर्नाटकचे राज्यपाल एच आर भारद्वाज आणि आसामचे राज्यपाल जे. बी. पटनायक यांनीही राजीनामे राष्ट्रपतींकडे सोपवले आहेत.

Jun 17, 2014, 03:55 PM IST

मोदींवर टीका केली म्हणून ९ विद्यार्थ्यांना अटक

कर्नाटकच्या गुरुवायुरच्या श्रीकृष्णा महाविद्यालयाच्या ‘कॅम्पस’ पत्रिकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल टीकात्मक वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली नऊ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आलीय.

Jun 16, 2014, 03:52 PM IST

गुप्तधनासाठी बापानं दिला चिमुकलीचा बळी

कर्नाटकातील फिरोजाबाद किल्ल्यातील गुप्तधन मिळावं यासाठी एका पित्याने आपल्या १५ महिन्यांच्या चिमुकलीचा बळी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. अंधश्रद्धेची बळी ठरलेल्या चिमुकलीच्या वडिलांसह सात जणांना अटक करण्यात आली आहे.

Jun 9, 2014, 02:32 PM IST

डबल व्होटींग... मतदानाचा `कानडा गेम`

पुणे-अमरावतीतील हजारो मतदारांची नावं मतदारयादीतून गायब आहेत. याउलट कुलाब्यातील अनेक मतदारांची नावे कर्नाटकातील मतदार याद्यांमध्येही नोंदली गेलीत. गेली अनेक वर्षे हे मतदार महाराष्ट्र आणि कर्नाटकात डबल व्होटिंग करतायत.

Apr 19, 2014, 12:20 PM IST

कर्नाटकात बसला आग, 6 जणांचा होरपळून मृत्यू

कर्नाटकमध्ये बंगळुरूच्या दिशेनं निघालेल्या एका प्रवासी बसला चित्रदुर्गजवळ आग लागली. या दुर्घटनेत सहा जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर 12 जणं जखमी झालेत.

Apr 16, 2014, 11:22 AM IST

सुषमा स्वराज - भाजपमधील धगधगतं महिला नेतृत्व

सुषमा स्वराज भारतीय जनता पक्षातील एक धगधगतं व्यक्तीमत्त्व. २००९मध्ये भाजप नेते लालकृष्ण अडवाणींच्या जागी त्यांनी लोकसभेचं विरोध पक्षनेते पद सांभाळलं.

Apr 4, 2014, 07:41 PM IST

चिमुरडीला जिवंत पुरणाऱ्या भोंदूबाबाला अटक

कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील झुंजरवाड येथे मंगळवारी रात्री १ वाजता ७ वर्षीय मुलीवर जीवघेणा अघोरी प्रकार केल्याप्रकरणी भोंदूबाबासह आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.

Feb 28, 2014, 11:51 AM IST

<b>नोकरीची संधी: कावेरी ग्रामीण बँकेत ७१६ जागा</b>

कावेरी ग्रामीण बँक ही एक प्रादेशिक ग्रामीण बँक आहे, २०१२मध्ये कर्नाटकातील तीन क्षेत्रीय ग्रामीण बँकांच्या एकत्रीकरणानंतर ही बँक निर्माण झालीय. बँकेचं मुख्य कार्यालय म्हैसुरला असून कर्नाटक राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये बँकेच्या शाखा आहेत.

Dec 16, 2013, 04:25 PM IST

बेळगाव हिवाळी अधिवेशनात मराठीची गळचेपी

बेळगावात कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. बेळगाव दक्षिणचे आमदार संभाजी पाटील आणि खानापूरचे अरविंद पाटील यांनी मराठी आणि हिंदी भाषकांवर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचण्यास मराठीतून सुरूवात केली.

Nov 25, 2013, 03:25 PM IST

एटीएम हल्ला: ‘ती’ महिला गंभीर, चोरी गेलेला फोन हस्तगत

बंगळुरूमध्ये काल एटीएममध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी एका व्यक्तीला आंध्रप्रदेशमधून अटक करण्यात आलीय. पकडलेल्या व्यक्तीकडून हल्ला झालेल्या महिलेचा मोबाईल फोन सापडलाय. अटक झालेल्या व्यक्तीनं तो हल्लेखोराकडून खरेदी केला होता.

Nov 21, 2013, 12:06 PM IST

‘कर्नाटकात राहणाऱ्यांना ‘कन्नड’ भाषा यायलाच हवी’

इतर राज्यांतून कर्नाटकात आलेल्या नागरिकांनी कन्नड भाषा शिकली पाहिजे, असे मत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केले आहे. कर्नाटकच्या ५८ व्या स्थापनादिवसनिमित्त ते बोलत होते.

Nov 2, 2013, 10:41 PM IST

अल्पसंख्याकांनी कर्जाची फेड न केल्यास चालेल!

अल्पसंख्याकांनी सरकारी संस्थांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न करणं हा त्यांचा हक्क असून, ही फसवणूक नाही, असं वादग्रस्त विधान केलंय कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष परमेश्वंर राव यांनी.

Oct 7, 2013, 02:58 PM IST

कर्नाटकनं पाळला ‘पाणी’धर्म, दुष्काळग्रस्त `जत`ला दिलासा!

दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. या परिसराला कर्नाटकचं पाणी मिळणार आहे. मुख्यमंत्री आणि वनमंत्री पतंगराव यांच्या प्रयत्नांना यश आलंय.

Sep 30, 2013, 12:12 PM IST

येडियुरप्पा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार

भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिलेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. भाजपने नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधान पदासाठी नाव जाहीर केल्यानंतर येडियुरप्पा यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे येडियुरप्पा भाजपमध्ये आले तर त्याचे श्रेय मोदींना असेल, अशी माहिती राजकीय सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Sep 18, 2013, 02:26 PM IST

कोण आहे यासिन भटकळ?

दहशतवादी यासिन भटकळ, ज्याला नेपाळ पोलीस, एनआयए आणि कर्नाटक स्पेशल टास्क फोर्सनं संयुक्तरित्या पकडलं. तो यासिन भटकळ ‘इंडियन मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेचा संस्थापक सदस्य आहे.

Aug 29, 2013, 12:16 PM IST