येडियुरप्पा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार

भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिलेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. भाजपने नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधान पदासाठी नाव जाहीर केल्यानंतर येडियुरप्पा यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे येडियुरप्पा भाजपमध्ये आले तर त्याचे श्रेय मोदींना असेल, अशी माहिती राजकीय सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 18, 2013, 02:26 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली
भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिलेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. भाजपने नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधान पदासाठी नाव जाहीर केल्यानंतर येडियुरप्पा यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे येडियुरप्पा भाजपमध्ये आले तर त्याचे श्रेय मोदींना असेल, अशी माहिती राजकीय सूत्रांकडून देण्यात आली आहे.
कर्नाटकातील जनता पक्षाचे येडियुरप्पा प्रमुख आहेत. येडियुरप्पा यांच्या केजेपी पक्षाने मोदींची पंतप्रधानपदासाठी निवड केल्याने त्यांचे स्वागत करणारा प्रस्ताव मंजूर केला आहे. ते मोदींच्या फेव्हर असल्याने त्यांच्या प्रवेशाची शक्यता आहे. मात्र, कर्नाटक भाजपमधील काही नेत्यांनी येडियुरप्पांच्या पुन्हा प्रवेशाला विरोध केला आहे.
केजेपीमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार पक्षाचा मोदींना पाठिंबा आहे. पण, भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करण्याबाबतचा निर्णय पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा असून, तेच अंतिम निर्णय घेतील, असे स्पष्ट करण्यात आले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.