एअर इंडिया

तीन प्रवाशांना उतरवून रिजिजूंनी मिळवली विमानात जागा?

केंद्रीय मंत्री किरण रिजिजू एका नव्या वादात फसलेत. हा वादही विमानाच्या उशीरा उड्डाणाशी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लेहहून दिल्लीला येणाऱ्या एका विमानाला जवळपास एक तास उड्डाणाला उशीर झाला... तो मंत्रिमहोदयांमुळे... इतकंच नाही तर रिजिजू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विमानात जागा देण्यासाठी विमानातून तीन प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं... यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे.

Jul 2, 2015, 12:20 PM IST

विमानाला आमच्यामुळे उशीर नाही : मुख्यमंत्री

'व्हीआयपीं'मुळे एअर इंडियाच्या विमानाची रखडपट्टी होण्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अमेरिकेत घेऊन जाणाऱ्या विमानाबाबत हा प्रकार घडला. सीएमचे प्रधान सचिव प्रवीणस‌िंग परदेशी यांच्यामुळे हा लेटमार्क पडला. मात्र, असं काही झालेलं नाही, असे मुख्यमंत्री यांनी ट्विट केलंय.

Jul 1, 2015, 11:30 AM IST

एअर इंडियाचा मान्सून धमाका, 1777 रुपयांत हवाई सफर

सार्वजनिक क्षेत्रातील विमान कंपनी एअर इंडियानं भारतात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर दिलीय. 

Jun 10, 2015, 02:54 PM IST

'एअर इंडिया'च्या 17 लेटलतिफ एअरहोस्टेसना फटका

कर्मचाऱ्यांची उशीरा येण्याची सवय सुधारण्यासाठी एअर इंडियानं आता कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतलाय... याच कठोर धोरणाचा फटका नुकताच 17 एअरहोस्टेसना बसलाय. 

May 28, 2015, 05:47 PM IST

येमेनमधून आतापर्यंत ४०००हून अधिक भारतीयांची सुखरूप सुटका

युद्धजन्य येमेनमध्ये फसलेल्या भारतीयांपैकी आतापर्यंत ४ हजार भारतीयांची सुखरूप सुटका करण्यात आलीय. सरकारतर्फे हवाईदलाकडून सुरू असलेलं बचाव अभियान आज संपवण्याचा निर्णय केलाय. मंगळवारी सनाहून ६०० आणि एकूण ७०० भारतीयांना येमेनमधून काढलं गेलं.

Apr 8, 2015, 11:18 AM IST

अबब! एअर इंडियाच्या विमानात को-पायलटची कॅप्टनलाच मारहाण

सहवैमानिकानं जर्मन विंग्जचे विमान मुद्दाम पाडून दीडशे प्रवाशांचा जीव घेतल्यानंतर वैमानिकांचं मानसिक स्वास्थ्य आणि सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला असतानाच एअर इंडियाच्या कॉकपीटमध्ये दोन वैमानिकांमध्ये मारहाण झाल्याचं वृत्त आहे. 

Apr 6, 2015, 11:36 AM IST

"आंदोलनासाठी अण्णा चार्टड विमानाने गेले नाहीत!"

अण्णा हजारे यांनी 23 फेब्रुवारी रोजी भूसंपादन कायद्यातील दुरूस्तीविरोधात दिल्लीत धरणे आंदोलन केलं.  या आंदोलनासाठी अण्णा हजारे चार्टड विमानाने गेल्याच्या अफवा सोशल मीडियावर सुरू आहेत, त्यासाठी काही जुने फोटो देखिल वापरले असल्याचं, अण्णांचे समर्थक विश्वंभर चौधरी यांनी म्हटलं आहे.

Feb 26, 2015, 04:30 PM IST

व्हिडिओ व्हायरल : एअर इंडियाची प्रवाशांशी असंवेदनशील वागणूक

एअर इंडियाची प्रवाशांना वाईट वागणूक दिल्याने संताप व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर या वागणुकीचा व्हिडिओ व्हायरल झालाय.

Feb 17, 2015, 03:03 PM IST

गुड न्यूज: एअर इंडियामध्ये भरतील ८०० पदं

भारतीय विमान कंपनी एअर इंडियामध्ये लवकरच ८०० नवीन पदांची भर्ती केली जाणार आहे. ८०० नवीन केबिन क्रूची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला सरकारनं मंजूरी दिल्याची माहिती आहे. 

Jan 6, 2015, 09:56 AM IST

दिल्ली-काबूल विमानाच्या अपहरणाचा इशारा

गुप्तचर विभागाने एअर इंडियाच्या दिल्ली-काबूल विमानाचं अपहरण होण्याचा इशारा दिला आहे. गुप्तचर विभागाने हायअलर्ट जारी केला आहे, यानंतर दिल्लीसह देशातील सर्व विमानतळांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Jan 4, 2015, 04:07 PM IST

नोकरी : 'एअर इंडिया'मध्ये भरती!

एअर इंडियामध्ये केबिन क्रू पदासांठी ६१ पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी, एअर इंडियानं १२ वी पास असलेल्या इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. तुम्हीही या पदासाठी इच्छुक असाल तर लवकर अर्ज सादर करा... 

Dec 25, 2014, 09:58 AM IST

प्रवाशाला मेलबर्न ते दिल्लीपर्यंत सीटला बांधून ठेवलं

एअर इंडियाच्या विमानात दारू पिऊन, एका प्रवाशानं गोंधळ घातला. या प्रवाशाने एवढा उच्छाद मांडला की, या मद्यधुंद प्रवाशाला सीटला बांधून, मेलबर्न ते दिल्लीचा प्रवास पूर्ण करावा लागला.

Aug 31, 2014, 10:27 AM IST

एअर इंडियावर प्रवाशांच्या उड्या, वेबसाईट क्रॅश

एअर इंडियाने 100 रूपयात विमान प्रवासाची योजना जाहीर केली आणि विमानात स्वतात सफर करू इच्छिणाऱ्यांनी एअर इंडियाच्या वेबसाईटवर उड्या टाकल्यायत.

Aug 27, 2014, 09:13 PM IST