'एअर इंडिया'च्या 17 लेटलतिफ एअरहोस्टेसना फटका

कर्मचाऱ्यांची उशीरा येण्याची सवय सुधारण्यासाठी एअर इंडियानं आता कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतलाय... याच कठोर धोरणाचा फटका नुकताच 17 एअरहोस्टेसना बसलाय. 

Updated: May 28, 2015, 05:47 PM IST
'एअर इंडिया'च्या 17 लेटलतिफ एअरहोस्टेसना फटका title=

मुंबई : कर्मचाऱ्यांची उशीरा येण्याची सवय सुधारण्यासाठी एअर इंडियानं आता कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतलाय... याच कठोर धोरणाचा फटका नुकताच 17 एअरहोस्टेसना बसलाय. 

एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या 17 केबिन क्रू मेम्बर्समुळे अनेकदा फ्लाईटसच्या उड्डाणामध्ये उशीर झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलीय. 

इतकंच नाही तर एअरलाईन्सनं शिस्तीचा अभाव असल्याचं कारण देत 272 केबिन क्रू मेम्बर्सनं कामावरून कमी केलंय. यावर्षी क्रू मेम्बर्सची कमी आणि शिस्तीचा अभाव या कारणांमुळे एअरइंडियाच्या ऑन टाईम परफॉर्मन्समध्ये मोठी तफावत आढळली. यानंतर मॅनेजमेंटनं कडक धोरण स्वीकारलंय. 

नुकतंच, एका केबिन क्रू मेम्बरनं गल्फमध्ये आराम फर्मावल्यामुळे विमानाच्या उड्डाणाला उशीर झाला होता.... यावेळी प्रवाशांना मात्र ताटकळत राहावं लागलं. याचमुळे त्याच्यावरही कारवाई करण्यात आलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.