तीन प्रवाशांना उतरवून रिजिजूंनी मिळवली विमानात जागा?

केंद्रीय मंत्री किरण रिजिजू एका नव्या वादात फसलेत. हा वादही विमानाच्या उशीरा उड्डाणाशी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लेहहून दिल्लीला येणाऱ्या एका विमानाला जवळपास एक तास उड्डाणाला उशीर झाला... तो मंत्रिमहोदयांमुळे... इतकंच नाही तर रिजिजू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विमानात जागा देण्यासाठी विमानातून तीन प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं... यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे.

Updated: Jul 2, 2015, 12:20 PM IST
तीन प्रवाशांना उतरवून रिजिजूंनी मिळवली विमानात जागा?  title=

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री किरण रिजिजू एका नव्या वादात फसलेत. हा वादही विमानाच्या उशीरा उड्डाणाशी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लेहहून दिल्लीला येणाऱ्या एका विमानाला जवळपास एक तास उड्डाणाला उशीर झाला... तो मंत्रिमहोदयांमुळे... इतकंच नाही तर रिजिजू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विमानात जागा देण्यासाठी विमानातून तीन प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं... यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ही घटना २४ जून रोजी घडली. उड्डाण भरण्यासाठी विमानाचे दरवाजे बंद झाले होते पण रिजिजू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या विमानात चढायचं होतं त्यामुळे या विमानाचं उड्डाण रखडवलं गेलं. 

एअर इंडियाच्या एका प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, या घटनेसंबंधी विस्तृत माहिती मागवण्यात आलीय. 

तर रिजिजू यांनी केलेल्या दाव्यानुसार, उड्डाणात आपल्यामुळे उशीर झाला नव्हता तर काही तांत्रिक कारणामुळे विमानाच्या वेळेत अगोदरपासूनच बदल करण्यात आला होता. 

यावेळी, रिजिजू सिंधु दर्शन महोत्सवात सहभागी झाल्यानंतर दिल्लीला परतत होते. आपण लेहहून हॅलीकॉफ्टरच्या साहाय्यानं दिल्लीला परतणार होतो. पण, खराब वातावरणामुळे हेलीकॉफ्टर श्रीनगरपर्यंत जाऊ शकत नव्हतं. यानंतर जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी मला एअर इंडियाच्या विमानानं परतण्यास सांगितलं, असं रिजिजू यांनी म्हटलंय. 

विमानात चढल्यानंतर इतर काही प्रवाशांना उतरवण्यात आलं का? या प्रश्नावर आपल्याला यांसंबंधी काहीही माहिती नसल्याचं रिजिजू यांनी म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.