मुंबई : 'व्हीआयपीं'मुळे एअर इंडियाच्या विमानाची रखडपट्टी होण्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अमेरिकेत घेऊन जाणाऱ्या विमानाबाबत हा प्रकार घडला. सीएमचे प्रधान सचिव प्रवीणसिंग परदेशी यांच्यामुळे हा लेटमार्क पडला. मात्र, असं काही झालेलं नाही, असे मुख्यमंत्री यांनी ट्विट केलंय.
परदेशी यांच्या पासपोर्टवर योग्य व्हिसापत्रच नसल्याचे आयत्यावेळी लक्षात आल्याने हे विमान तब्बल एक तास २० मिनिटे उशिराने हवेत झेपावले. दरम्यान, पासपोर्ट आणि व्हिसाची तपासणी सुरुवातीलाच का करण्यात आली नाही याची चौकशी कस्टम्स विभाग करणार असल्याचे सांगण्यात येते.
'एआय १९१' या मुंबई ते नेवार्क विमानातून मुख्यमंत्री त्यांचे प्रधान सचिव परदेशी व अन्य अधिकाऱ्यांसोबत अमेरिकेस रवाना होणार होते. व्हीआयपींना प्रोटोकॉल असल्याने ते इमिग्रेशनसाठीही उभे राहत नाहीत. साहजिकच परदेशी यांनी बोर्डिंग पास घेतल्यानंतर त्यांचा पासपोर्ट तपासणे, चेक-इन, इमिग्रेशन आदी प्रक्रिया विनासायास पार पडली.
मात्र, एअर इंडियाकडे फ्रॉड तपासणीचा विभाग असल्याने तेथे परदेशींच्या पासपोर्टवर अमेरिकेचा योग्य व्हिसाच नसल्याचे लक्षात आले. परदेशी तसेच विमानातून गेले असते, तर अमेरिकेत त्यांच्यावर मोठी नामुष्की ओढवली असती. आणि त्यांना सोबत नेले नसते तर विमानात ठेवलेले त्यांचे सामान उतरवून घेण्यातही बराच वेळ गेला असता. अखेर परदेशींनी एका व्यक्तीस घरी पाठवून पासपोर्टची जुनी पुस्तिका मागवून घेतली. मात्र, या सगळ्या गोंधळात विमान उशिराने हवेत झेपावले.
The allegation that I forced to delay the flight to New York is false & misleading. I totally deny it.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 30, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.